राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावर दुपारी 2:30 वाजता सुनावणी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ नोव्हेंबर २०२२


सीबीआयच्या प्रकरणात दाखल जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीसाठी अनिल देशमुखांकडून विनंती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी याप्रकरणात तात्काळ सुनावणी का हवी? असा सवाल देशमुखांच्या वकिलांना विचारला. त्यावर वकीलांनी हायकोर्टात देशमुखांचं वाढत वय आणि खालावलेली तब्येत याचा दाखला दिला. त्याशिवाय, ईडीच्या प्रकरणात त्यांना जामीन देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. देशमुखांच्या जामीनावर सुनावणी कधीपासून सुरू होणार हे आज निश्चित होण्याची शक्यता आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *