निगडी येथील पवळे उड्डाणपुलाखाली हातगाडीवाल्यांनी केले अतिक्रमण

११ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


निगडी येथील पवळे उड्डाणपुलाखालील टिळक व महाराणा चौकामध्ये पिंपरीहून प्राधिकरणाकडे येताना डाव्या बाजूने जाण्याऱ्या टिळक चौकापासून गोकूळ स्वीटस मार्टपर्यंत खाद्यपदार्थ आईस्क्रीम , वडापाव , मसाला डोसा , इडली सांबार , पोहे , पाणीपुरी व फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या रस्त्यांच्या कडेला लावलेल्या असतात . त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे . निगडीतील चौकातील वाहतूक समस्या गंभीर होऊ लागली आहे चौकात येणाऱ्या खवय्यांची आसन व्यवस्था स्टूल टाकून व गाड्या रोडवरच उभ्या केलेल्या असतात . वडापाव , मसाला डोसा , असे पदार्थ धोकादायक पद्धतीने गॅस सिलिंडर शेगडीवर उघड्यावरच बनवितात

उन्हाळ्यात रसवंती सेंटर ही इथे असतात . रस्त्यावरील सावली हॉटेल , प्रदीप स्वीट मार्टमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या गाड्या रोडवरच पार्किंग असते . रोडच्या कोपऱ्यातील रिक्षास्टँडमुळे होणारी कोंडी , सायंकाळी प्राधिकरणात जाणाऱ्या वाहनचालकांना गाडी चालविणे त्रासदायक व पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागते . पलीकडे निगडी पीएमपीएल बसथांब्याकडे महाराणा प्रताप पुतळ्यासमोर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या उभ्या असतात . तिथेच अनधिकृतपणे पॅसेजर घेण्यासाठी रिक्षावाल्याची रस्सीखेच रस्सीखेच आणि बसथांबाच्या बसेस यामुळे नियमित होणारी वाहतूक कोंडी प्रचंड असते भोसरी कडे जाणाऱ्या बससाठी बसथांबा , यमुनानगरकडे जाणाऱ्या रोडवरील कोपऱ्यात अनधिकृतपणे थांबलेल्या रिक्षा व खाद्य पदार्थांच्या हातगाड्या असून चाकण , भोसरी , आळंदीकडे जाणाऱ्या वाहतुकीने वाहतूककोंडी होते . पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कारवाई संबंधीचे कायमस्वरूपी बोर्डही असून कोणीही जुमानत नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *