संजय राऊत डरपोक नाहीत, जे डरपोक होते ते पळून गेले – आदित्य ठाकरे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०९ नोव्हेंबर २०२२


खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तोफ पुन्हा एकदा रणांगणात आली आहे. संजय राऊत हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ते उगाच नाव लावून फिरत नाहीत, त्यांनी मुखवटा लावलेला नाही. हे बाळासाहेब ठाकरे यांचे खरे शिवसैनिक आहेत असं आदित्य ठाकरे म्हणाले.

संजय राऊत डरपोक नाहीत. संजय राऊत हे गद्दार नाहीत. संजय राऊत यांच्याविरोधातही दबाव तंत्र वापरण्यात आलं होतं. पण ते पळून गेले नाहीत. ते डरपोक नाहीत हे लोकांसमोर आलं आहे. जे डरपोक होते ते पळून गेले. मी आता तेच सांगितलं जे कोणी सत्तेविरोधात आवाज उठवतात, सरकारविरोधात बोललं की दबावतंत्र वापरलं जातं. आज राजकीय लोकांवर कारवाई होते, उद्या ज्यांना ते एचएमव्ही बोलतात त्यांच्यावरही कारवाई होईल ही देशासाठी धोक्याची घंटा आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *