आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समितीत 29 हजार कांदा पिशवी आवक

रामदास सांगळे
विभागीय संपादक
०९ नोव्हेंबर २०२२

आळेफाटा


कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर अंतर्गत दुय्यम बाजार आवार आळेफाटा येथे मंगळवार दिनांक 8 रोजी 29 हजार 679 कांदा पिशव्यांची आवक झाली. यामध्ये गोळे कांदा नंबर १ प्रति दहा किलोसाठी 240 ते 300 रुपये, सुपर कांदा नंबर २, 190 ते 240,हलके कांदा 150 ते 210, रुपये, तीन नंबरला 110 ते 180 रुपये, गोल्टी कांदा नंबर चार 70 ते 110 रुपये,तर बदला व चिंगळी कांदा नंबर 5, 50 ते 120 रुपये असा बाजार मिळाला.

मागच्या काही महिन्यांपूर्वी जो बाजार होता त्यापेक्षा सध्या चांगला भाव आहे परंतु कांदा चाळीमध्ये कांदा पावसामुळे खराब होत असल्याने बळीराजा आता तो मार्केटमध्ये नेऊ लागला आहे. जुना कांदा आता संपत चालला आहे. ३० रुपये हा बाजार भाव कमी असल्याने उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही.कांद्याला ५० रुपये हमीभाव द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.आळेफाटा बाजारात या महिन्यात उच्यांकी कांदा आवक होत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *