पुणे महापालिकेकडून रस्त्याचे रुंदीकरण, नदीकाठच्या रस्त्यावरील अडथळा दूर

०९ नोव्हेंबर २०२२

पुणे


एरंडवणे येथील म्हात्रे पुलाजवळील नदीकाठच्या रस्त्यावरील अडथळा दूर झाला आहे. रजपूत झोपडपट्टीतून जाणाऱ्या आणि एक दशकाहून अधिक काळ रखडलेल्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. रजपूत झोपडपट्टी परिसरातील ३६ घरांचे महापालिकेकडून पुनर्वसन करण्यात आले आहे.सध्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून सांडपाणी वाहिन्या टाकण्याची कामे महापालिकेकडून हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. येत्या दोन आठवड्यात रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे कर्वे नगर, कोथरूड, सिंहगड रोड आणि वारजे परिसराकडे जाणे सुलभ होणार असून रजपूत झोपडपट्टी परिसरात होणारी वाहतूक कोंडीही दूर होण्याची शक्यता आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *