रेशन दुकानातच आता भरा फोन, वीज अन् पाणी बिल !

०७ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


रेशन दुकानांमध्ये महा ई सेवा केंद्राप्रमाणे फोन , वीज अन् पाणीपट्टी भरण्याची सेवा नागरिकांना मिळणार आहे . ‘ मल्टीपर्पज ‘ सेवा सुरू करण्यासाठी राज्य शासनाने मोहीम हाती घेतली आहे . या उपक्रमासाठी पुरवठा विभागाने तयारी सुरू केली आहे . ग्रामीण व शहरी भागासाठी हे केंद्र असेल . नागरिकांना सर्वव्यापी सुविधा मिळण्यासाठी व रेशन दुकानदारांना काही प्रमाणात उत्पन्नाचे साधन मिळण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे . रेशन दुकातात मिळणार या सुविधा फोनबिल भरणे , वीजबिल भरणे , पाणीपट्टी भरण्यासाठी रेशन दुकानात सुविधा मिळणार आहेत . यांसह आगामी काळात मनी एक्स्चेंज व इतर सुविधाही मिळू शकतील.

सेवा केंद्राचे देणार प्रशिक्षण रेशन दुकानात सेवा केंद्र सुरू करण्यासाठी पुरवठा विभागाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे . सेवा केंद्र चालवायचे कसे , याबाबत दुकानदारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे . पहिल्या टप्प्यात काही दुकानादारांना प्रशिक्षण देऊन हे ‘ मल्टीपर्पज ‘ सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत .दुकानांची नोंदणी पुरवठा विभागाकडून या उपक्रमासाठी रेशन दुकानांची नोंदणी करण्यात येत आहे , त्यांचे ऑनलाइन आयडी ‘ तयार झाले आहेत . शहरातील रेशन दुकानांनाही या उपक्रमात नोंदणी करण्यात येणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *