आरोप करणारे आरोप करत असतात; अब्दुल सत्तार यांच्यावरील आरोपांवर दिपक केसरकर यांची प्रतिक्रिया

२७ डिसेंबर २०२२


अब्दुल सत्तार पुन्हा एकदा विरोधकांच्या आरोपावरून चर्चेत आले आहे. शिंदे-भाजप सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सत्तार यांनी वाशिमच्या घोड बाभूळ परिसरातील ३७ एकर १९ गुंठे गायरान जमिनीचं सत्तार यांनी एका व्यक्तीला अनधिकृत रित्या वाटप केल्याचा आरोप आहे. यावरून विधानसभेत अजित पवारांसह विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे

आरोप करणारे आरोप करत असतात. पण ज्या मंत्र्यांवर आरोप झाले आहेत, त्यांनी उत्तर देणार असल्याचं जाहीर केलं आहे. ते आज उत्तर देतील. सीमाभागाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. त्यांसंबधी मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलावली आहे. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागाला न्याय दिला पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे काय सवलती देता येतील यावर विचार करुन त्यासंबंधीच्या घोषणा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतील, असं केसरकरांनी सांगितलं आहे.

कामकाजाचं आजचं स्वरुप कसं असेल हे मी आता सांगू शकणार नाही. मुख्यमंत्री यासंबंधी घोषणा करतील. कर्नाटकविरोधातील ठराव तर होणारच आहे, पण याशिवाय सीमाभागासाठी दिल्या जाणाऱ्या सवलतींबद्दल घोषणा मुख्यमंत्री करतील,अशी माहिती केसरकर यांनी दिली


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *