घरी मी त्यांची पत्नी, पण बाहेर सेवक आहे; रवी राणा-बच्चू कडू वादावर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०३ नोव्हेंबर २०२२


आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादाला पूर्णविराम मिळाला असताना आता नव्याने वाकयुद्ध सुरु झालं आहे. रवी राणा यांनी घरात घुसून मारण्याची भाषा केल्याने बच्चू कडू समर्थकही आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू यांनी आपल्याला हा वाद वाढवायचा नाही असं सांगितलं आहे. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेणार आहेत. दरम्यान रवी राणांच्या पत्नी नवनीत राणा यांनीही यावर भाष्य केलं आहे.

नवनीत राणा म्हणाल्या की, मला त्या विषयावर काही बोलायचं नाही. हा माझा विषय नाही. माझ्यासाठी माझं काम महत्त्वाचं असून, मी त्यासाठी जात आहे, असं त्यांनी मुंबईला निघण्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. ज्याप्रमाणे ते बोलतात त्यापमाणे आम्ही करतो. मी घरी त्यांची पत्नी आहे, पण बाहेर सेवक आहे, असं सांगत त्यांनी वादावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. ते दोघे मला सिनियर आहेत. त्यांना माझ्यापेक्षा जास्त कळतं. त्यामुळे त्यावर मी काही बोलणार नाही असंही त्या म्हणाल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *