कोविड लसीकरणाचे टोकन घरोघरी जाऊन देण्यात यावे- पिं. चिं. महिला काँग्रेस शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांची मागणी…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी – दि १६ जुलै २०२१
पिंपरी चिंचवड शहरांमध्ये कोविड लसीकरण आपल्या अखत्यारीत असलेल्या आरोग्य विभागाच्या नियोजनानुसार सर्व आरोग्य अधिकारी,डॉक्टर सहडॉक्टर, परिचारिका,आरोग्य कर्मचारी यांच्या वतीने शहरात लसीकरण केंद्रावर चांगल्या रीतीने चालू आहे. नागरिकांना वार्तापत्र,सारथी ॲप, डिजिटल मीडिया मधूनही नागरिकांना लसीकरणाच्या एक दिवस पूर्वी माहिती मिळते आहे. या सर्व सोयी बद्दल आपले अभिनंदन!


परंतु शहरातील लसीकरण केंद्रावर लसीकरणाच्या दिवशी टोकन वाटप बाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असताना दिसून येते टोकन वाटप होत असताना ज्यांनी कोवॅक्सीन घेतले आहे ती व्यक्ती कोविशिल्ड च्या लसीकरणाचे टोकन घेऊन जाते लस देत असताना तिथे रिजेक्ट होते,यामुळे ज्यांना खरंच गरज आहे असेअनेक वृद्ध,वयस्कर लोकांना लस मिळत नाही व गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.टोकन वाटप बाबत योग्य नियोजन करणे गरजेचे आहे 18 ते 44 लोकांचेही 100% ऑनलाइन असल्यामुळे काही वेळातच बुकींग फुल होते यामुळे शहरातील नोकरदार कामगार वर्ग,विद्यार्थी व्यवस्थेमुळे यांना लसीकरण दिवशी सुट्टी घ्यावी लागते आणि टोकन मिळाले नाही तर त्यांना भुर्दंड सोसावा लागत आहे
महोदय या सर्व परिस्थिती बघता आपण लसीकरणाच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे टोकन आपण शहरातील नागरिकांना घरोघरी आपल्या नियोजन यंत्रणे मार्फत देण्यात यावे जेणेकरून टोकन मिळाल्यावर ती व्यक्ती पहिला डोस व दुसरा डोस व 18 ते 44 वयातील लोकांना लस घेण्यास सोयीचे होईल तरी त्वरित आपण अशी कार्यवाही करावी व लसीकरणा मध्ये सुसूत्रता आणावी अशी मागणी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे काँग्रेस महिला शिष्ट मंडळाद्वारे निवेदन देऊन केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *