आदित्य ठाकरे यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ नोव्हेंबर २०२२


आदित्य ठाकरे यांनी टीका उदय सामंत यांच्यावर केली आहे. ते आज अकोल्यात आयोजित सभेत बोलत होते. घटनाबाह्य सरकार स्थापन होताच उद्योगमंत्र्यांनी वेदान्त फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये पळवला. महाराष्ट्राच्या हक्काचा, येथील तरुणांना रोजगार मिळून देणारा हा प्रकल्प होता. याप्रमाणेच मेडीकल डिव्हाईस प्रकल्प, ड्रग्ज पार्क, टाटा एअरबस यासारखे प्रकल्पही गुजरातमध्ये पळवून नेले. आमच्या पाठिशी खंजीर खुपसला ते ठीक, पण तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीत खुपसला अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

सुभाष देसाई उद्योगमंत्री असताना त्यांनी साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. लाखो रोजगार आणले, जे दुसऱ्या राज्यांना जमलं नाही, ते महाराष्ट्राने करून दाखवलं होते. मात्र, आता जे घटनाबाह्य सरकार स्थापन झाले आहे. हे गद्दारांचे सरकार आहे. काही महिन्यातच हे सरकार कोळणार आहे. हे सरकार अस्थित्त्वात आल्यांतर उद्योगमंत्री कोण आहे? हे महाराष्ट्राला माहिती नाही. त्याचं नावही महाराष्ट्राला माहिती नाही. त्यांचे उद्योगही माहिती नाही असेही ते म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *