काळेवाडीत तीन लाखांची घरफोडी

०२ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


एकाच इमारतीमधील दोन प्लॅटमध्ये चोरी करून तब्बल तीन लाख १७ हजार ५०० रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली . हा प्रकार मंगळवारी दि . २५ सकाळी दहा ते शनिवारी दि . २९ रात्री अडीचच्या दरम्यान साई अपार्टमेंट , तापकीरनगर , काळेवाडी येथे घडला . या प्रकरणी प्रकाश ज्ञानदेव माने वय ५२ , तापकीरनगर यांनी वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी दि . ३१ फिर्याद दिली . त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , साई तापकीरनगरमधील अपार्टमेंटमधील फिर्यादीच्या फ्लॅटचा कडी – कोयंडा तोडून चोरट्याने तब्बल दोन लाख ३२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व फिर्यादी यांचे शेजारी मानसिंग शिवराम बर्गे वय ५१ यांचे ६० हजार रुपये किमतीचे दागिने तसेच २५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण तीन लाख १७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *