पिपरी चिंचवड शहरात रेकॉर्ड ब्रेक २४६३ कोरोणाची नोंद तर १९ जणांचा मृत्यू…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी : दि २ एप्रिल २०२१
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढतच चालला आहे. आज शुक्रवारी (दि. ०२ एप्रिल) रोजी पहिल्यांदाच चोवीस तासात २४६३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. कोरोनाचा कहर वाढतच चालल्याने शहरवासीय चिंतेत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १५०७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

     पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर माई ढोरे यांचा पूर्णतः लॉकडाऊनला विरोध असल्याचे आपला आवाजकडे बोलताना सांगितले. पूर्णतः लॉकडाऊन झाला तर अर्थवस्थेचे कंबरडे मोडेल. त्यामुळे शहरातील नागरिकांनी सरकारने घालून दिलेल्या सगळ्या नियमांचे पालन करावे म्हणजे ही साखळी तोडण्यास मदत होईल. विनाकारण गर्दी करू नका. मास्क चा वापर करा. गर्दीची  ठिकाणी टाळा. असे बोलताना सांगितले. 

पिंपरी चिंचवड शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १,४४,७१४ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १,२२,९९० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २०३४ जणांचा मृत्यू झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *