राज्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डांना निधी देणार : मंत्री उदय सामंत

दि .३०/१२/२०२२
नागपूर


नागपूर : “राज्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरविकास विभागाकडून कालबद्ध कार्यक्रम आखून या कॅन्टोन्मेंट बोर्डांना निधीही उपलब्ध करून दिला जाईल”, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

याबाबतची लक्षवेधी सूचना सिद्धार्थ शिरोळे यांनी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना श्री सामंत बोलत होते.

श्री. सामंत म्हणाले की, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विकासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला पाहिजे तो दिला जात नाही. कॅन्टोन्मेंट बोर्डाला महाराष्ट्र शासनाच्यावतीने जीएसटीचा हिस्सा दिला जात नाही. या बोर्डाचा पायाभूत सुविधांचा विकास कारण्याबाब महाराष्ट्र शासन निधी उपलब्ध करून देतो.

राज्यातील देहू, आळंदी, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, खडकी, देवळाली, या कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी नगरविकास विभागामार्फत 2018 मध्ये निर्णय घेतला त्याप्रमाणे नगरी विकास विभागाकडून या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पायाभूत सुविधांना साठी निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे.त्या प्रमाणे निधी उपलब्ध करून दिली जातो.

या लक्षवेधी सूचनेत सदस्य श्रीमती माधुरी मिसाळ, सरोज आहिरे यांनी सहभाग घेतला होता.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *