अंधेरी पूर्व मतदारसंघात कुठल्या पक्षाची ताकद आहे, हे लवकरच कळेल – पृथ्वीराज चव्हाण

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१७ ऑक्टोबर २०२२


मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतली. भाजपाचे मुरजी पटेल उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. विजयाची खात्री असती तर भाजपानं माघार घेतली नसती अशी प्रतिक्रिया यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

पोटनिवडणुकीत भाजपाला जर पराभवाचा सामना करावा लागला असता, तर त्याचा परिणाम आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर होईल, असे वाटत असल्यानेच भाजपाने या निवडणुकीतून माघार घेतल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढवू नका, असं आवाहन केलं होतं. हे पत्र म्हणजे या निवडणुकीतून पळवाट काढण्याचा भाजपाचा मार्ग होता, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघात कुठल्या पक्षाची ताकद आहे, हे लवकरच कळेल. महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेला प्रकार सामान्य जनतेला आवडलेला नाही, याची जाणीव लवकरच भाजपाला होईल. अशी प्रतिक्रिया चव्हाण दिली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *