बाहेरगावावरून वल्लभनगर येणाऱ्या एसटी बस धोकादायक स्थितीत

पिंपरी प्रतिनिधी
१४ ऑक्टोबर २०२२


वल्लभनगर आगारात संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून एसटी बसेस येतात . मात्र , यापैकी काही बसच्या समोरील आणि मागील भागाचे पत्रे बाहेर आलेली आहेत , तर काहींचे नटबोल्ट तुटलेली दिसून येतात त्यामुळे या धोकादायक स्थितीमध्ये असलेल्या बस मार्गावर धावणे चुकीचे आहे . त्याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात एसटीचा पत्रा लागून दोन व्यक्तिचे हात कापले गेले होते . त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.

पिंपरी – चिंचवड शहरातील वल्लभनगर आगारात औरंगाबाद, नांदेड, अहमदनगर ,नाशिक, आदींसह संपूर्ण महाराष्ट्रामधून तर कर्नाटकामधूनदेखील बस येतात . या बसच्या समोरील व मागच्या बाजूला असलेली पत्रे, नटबोल्ट निघालेले असतात. या वाहनांची अवस्थाधोकादायक असल्याने नागरिक अपघाताला बळी पडूशकतात . त्यामुळे सर्वसामान्यांसाठी माफक दरात आणि सोयीची असलेली लालपरी म्हणजेच एसटीबाबत नागरिकांमध्ये नकार घंटा पसरवू नये . यासाठी महामंडळाने अशी वाहने दुरुस्त करून घ्यावी . त्यामुळे होणारे अपघात टळतील आणि नागरिकांचे प्राणही वाचतील , असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *