टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तीन गोलंदाज ऑस्ट्रेलियाला होणार रवाना

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ ऑक्टोबर २०२२


भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे आणि पहिल्याच सराव सामन्यात विजय मिळवला आहे. पण, रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह हे दोन धक्के पचवून भारतीय संघाला या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळ करावा लागणार आहे. जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट अद्याप जाहीर झाली नसताना आणखी एक धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचा फलंदाजांचा आत्मविश्वास चांगला झाला आहे. कारण त्यानंतर झालेल्या आफ्रिकेच्याविरुद्धच्या मालिकेतही टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्याने टीम इंडिया विजयी झाली. गोलंदाजांची मात्र दोन्ही मालिकेत निराशी केली, कारण समाधानकारक कामगिरी अद्याप झालेली नाही.

आशिया चषकापासून टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली नाही. त्यामुळे गोलंदाजांच्या कामगिरीकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह स्पर्धेतून बाहेर झाला आहे. दीपक चाहर हा सुद्धा चांगली गोलंदाजी करीत होता. परंतु आफ्रिकेच्या विरुद्ध खेळत असताना त्याला सुद्धा दुखापत झाल्याने तो विश्वचषकाच्या बाहेर पडला आहे.भारताचे अनेक महत्त्वाचे खेळाडू यापुर्वी ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत. त्यांनी सराव सामने सुद्धा खेळले आहेत. आता मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर हे तीन गोलंदाज ऑस्ट्रेलियात रवाना होणार आहे. यापैकी कोणत्या गोलंदाजाला संधी मिळते हे पाहावं लागणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *