राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आज राज्यभर ‘चुल मांडा’ आंदोलन…

राज्यातील पेट्रोलपंपावर असलेल्या मोदींच्या बॅनरखाली ‘चुल मांडत’ महिलांनी मोदींच्या नावाने घातला शिमगा…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी दि. २८ फेब्रुवारी २०२१
केंद्रसरकारने केलेल्या गॅस ,पेट्रोल व डिझेल दरवाढीबाबत आज राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने पेट्रोलपंपावर असलेल्या मोदींच्या बॅनरखाली ‘चूल मांडा’ आंदोलन केले.

महाराष्ट्रातील प्रत्येक पेट्रोल पंपावर ज्याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फसव्या जाहिरातीचे बॅनर आहेत,त्या प्रत्येक ठिकाणी महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली
‘चुल मांडा’ आंदोलन करून निषेध नोंदविला.

फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा गॅस दरवाढ केलेली आहे.४ फेब्रवारीला २५ रूपये,१४ फेब्रवारीला ५० रुपये ,२४ फेब्रुवारीला २५ रुपये म्हणजेच एका महिन्यात १०० रूपयांनी केलेली गॅसदरवाढ सर्वसामान्य नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त करणारी आहे असा आरोप रुपालीताई चाकणकर यांनी केला आहे.

पंतप्रधान मोदींनी जाहिरातीसाठी ५२४५ कोटी रूपये खर्च केले आहेत. उज्ज्वला गॅस योजनेसारख्या फसव्या जाहिराती करून जनतेची दिशाभूल करणारे हे केंद्रसरकार दिवसाढवळ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशावर “दरोडा “घालत आहे असेही रुपालीताई चाकणकर यांनी स्पष्ट केले.

आज पिपंरी चिंचवड येथे महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे,महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल काळभोर, नगरसेविका संगिता ताम्हाणे, नगरसेविका सुलक्षणा धर,कविता आल्हाट, संगिता आहेर, मनिषा गटकळ व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *