जुन्नर तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी एम.बी. दुराफे भाऊसाहेब

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२८ जुलै २०२२

नारायणगाव


जुन्नर तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी एम.बी. दुराफे भाऊसाहेब व उपाध्यक्ष पदी श्री.आहिरे भाऊसाहेब यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यासाठी प्रदिप खिलारी भाऊसाहेब यांनी माघार घेऊन बिनविरोध निवडीसाठी विशेष सहकार्य केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन संघटनेचे जिल्हा सरचिटणीस अनिल बगाडे, जिल्हा उपाध्यक्ष नीलेश पांडे, महिला उपाध्यक्षा सांडभोर मॅडम, नाथ भाऊसाहेब, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष भोसले यांनी काम पाहिले.

उपाध्यक्षपदी आहिरे भाऊसाहेब यांची निवड

निवडणूक प्रक्रियेत सहभागी सर्व कार्यकारणी व ग्रामसेवक बंधु भगिनिंचे यावेळी सत्कार व सन्मान करण्यात आले. निवडणूक निर्णय प्रक्रिया बिनविरोध पार पडल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *