एकनाथ शिंदे हे बिनपक्षाचे मुख्यमंत्री आहेत – सुनील राऊत

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ ऑक्टोबर २०२२


संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर टीका केली आहे. भाजपाने कितीही अन्याय केला तरी संजय राऊत बाहेर येतील आणि भाजपाच्या अन्यायविरोधात उठवण्याचे काम करेल, महाराष्ट्रात पुन्हा एकदा ते शिवसेनेचा आवाज भक्कम करण्याचा प्रयत्न करतील, अशी प्रतिक्रिया सुनील राऊत यांनी दिली.

बंडखोरी नंतर मलाही पैशांची ऑफर होती. ४० गद्दारांपेक्षा जास्त पैशांची ऑफर मला आली होती. मात्र, पैशांपेक्षा मला शिवसैनिकांचे प्रेम आणि समर्थन मोलाचे आहे, असेही ते म्हणाले. जोपर्यंत भाजपाचे राज्य आहे, असा अत्याचार सुरू राहणार आहे. भाजपाला काहीही झालं तरी सत्ता पाहिजे. १०० पेक्षा जास्त आमदार असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि ज्यांचा काही पक्ष नाही, नाव नाही ती व्यक्ती मुख्यमंत्री कशी? एकनाथ शिंदे हे बिनपक्षाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे कोणताही पक्ष नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *