आळेफाटा येथील डॉ. स्वप्नील पिसे यांचा तारकर्लीच्या समुद्रात बुडून अपघाती मृत्यू

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
२४ मे २०२२

आळेफाटा


आळेफाटा (ता. जुन्नर) येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मारुती पिसे (वय ४५) यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २४) मालवणमधील तारकर्लीच्या समुद्र किनाऱ्यावर घडली.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आळेफाटा येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. स्वप्नील पिसे आपल्या कुटुंबियांसह मालवणमधील तारकर्ली येथे पर्यटनासाठी गेले होते. मंगळवारी सकाळी तारकर्लीच्या समुद्र किनाऱ्यावरून २० जणांना घेऊन बोट स्कुबा डायव्हिंगसाठी गेली होती. त्यानंतर स्कुबा डायव्हिंगही व्यवस्थित पार पडले. मात्र, तेथून परत येताना घात झाला. ही बोट समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असतानाच अचानक उलटली.

बोट उलटल्यानंतर पर्यटकांना वाचावण्यासाठी मदतकार्य सुरु झाले. या सर्वांना समुद्रातून बाहेर काढेपर्यंत डॉ. स्वप्नील पिसे यांचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबियांवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बोटीतील सर्व पर्यटक हे पुणे आणि मुंबईतील असल्याचे समजते. शांत, संयमी आणि कार्यतत्पर आणि मदतीसाठी कधीही धावून येणाऱ्या डॉक्टरांचा बुडून मृत्यू झाल्याने अनेक जण हळहळ व्यक्त करत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *