गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी केली ,श्री क्षेत्र भीमाशंकर येथील विकास आराखड्यातील कामाची पाहणी

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
११ ऑक्टोबर २०२१

भिमाशंकर

श्री क्षेत्र भीमाशंकर येथील मंदिर परिसरात गृहमंत्री श्री. वळसे पाटील यांनी भेट दिली व श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरातील विकास आराखड्याची माहिती घेतली.भीमाशंकर मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांचे काम लवकरच सुरू होणार आहे. या कामाचा आराखडा समजून घेवून भाविकांना येण्याजाण्यास सोईस्कर होईल या पद्धतीने दर्शन रांग करण्याबाबत श्री.वळसे पाटील यांनी सुचना दिल्या. तसेच विकास आराखड्या संदर्भात विविध विभागांकडून सुरू असलेल्या कामांचा तसेच आगामी काळात होणाऱ्या कामांचा आढावा व निधी पुर्ततेबाबत लवकरच उपमुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत बैठक घेणार असल्याचेही श्री. वळसे पाटील यांनी सांगितले.

श्री क्षेत्र भीमाशंकर परिसर विकास आराखड्यातुन भिमा नदी पात्र, मोक्षकुंड, भिमा उगम, निगडाळे ते भीमाशंकर रस्ता काॅंक्रीटीकरण आदी कामे सुरू आहेत. या कामाबाबत कार्यकारी अभियंता बी.एन.बहीर, प्रातांधिकारी सारंग कोडीलकर यांनी माहिती दिली.यावेळी पंचायत समिती सभापती संजय गवारी देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, मधुकर गवांदे, रघुनाथ कोडीलकर, दत्तात्रय कौदरे, भिमाशंकरचे उपसरपंच दत्तात्रय हिले, उपस्थित होते.