राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ ऑक्टोबर २०२२


रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खराब झाला असून, ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा वाढता धोका लक्षात घेता राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात २०२५ पर्यंत राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुण्यात ‘नैसर्गिक शेती’ राज्यस्तरीय परिषद 2022 चे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.

फडणवीस म्हणाले, २०१६-१७ मध्ये नैसर्गिक शेतीचे अभियान सुरू केल्यानंतर राज्यात ९.५ लाख हेक्टर शेती नैसर्गिक पद्धतीने होत आहे. दुसऱ्या टप्प्यात हे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी व फलोत्पादन विभागाने आखलेल्या कार्यक्रमाला आवश्यक निधी देण्यात येईल. यामुळे शेतकरी सुजलाम्-सुफलाम् होईल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *