धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या; शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ ऑक्टोबर २०२२


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या घटनेला निवडणूक आयोगापुढे आव्हान दिले असून खरी शिवसेना कोणाची, यावर तातडीने निर्णय देण्याची मागणी केली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आम्हाला तातडीने मिळावे अशी मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केली आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून खरी शिवसेना आम्ही असल्याने पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह तातडीने आम्हाला मिळावे. अन्यथा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून त्या चिन्हाचा वापर होण्याची शक्यता आहे. काही कारणास्तव धनुष्यबान चिन्ह आम्हाला तातडीने देणे शक्य नसल्यास या चिन्ह बाबत तातडीने काही आदेश द्यावा अशी विनंती करत अप्रत्यक्षरित्या धनुष्यबाणचिन्ह प्रसंगी गोठवण्याची मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *