दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या आराखड्याला मान्यता देणार – देवेंद्र फडणवीस

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०६ ऑक्टोबर २०२२

नागपूर 


गेल्या दोन अडीच वर्षापासून रखडलेल्या 190 कोटींच्या दीक्षाभूमी विकासाच्या सुधारित आराखड्याला पुढील 15 दिवसात मान्यता देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूरमध्ये केली.

यावर्षीही तीन दिवसात ३० लाख लक्ष नागरिकांनी दीक्षाभूमी ला भेट दिली. दस-याला पाऊस सुरू असतानाही अनुयायांनी गर्दी केली होती. दीक्षाभूमीच्या विकासासाठी यापूर्वी शंभर कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला होता. त्यापैकी ४०कोटी रुपये नागपूर सुधार प्रन्यासकडे जमा असून ६० कोटी रुपये देण्याची राज्य शासनाची तयारी होती. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये पाठपुराव्या अभावी दीक्षाभूमी आराखडा रखडला. आता पुढील पंधरा दिवसात सुधारित १९० कोटींच्या आराखड्याला मान्यता देण्यात येईल, तसेच केंद्र सरकारकडे प्रलंबित तज्ञ बाबींसाठी पाठपुरावा देखील केला जाईल, असे फडणवीस म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *