शहराला डेंग्यूचा डंख महिनाभरात आढळले ९८ रुग्ण

पिंपरी प्रतिनिधी
०६ ऑक्टोबर २०२२


डेंग्यूची रुग्णसंख्या सध्या चांगलीच वाढली आहे . सप्टेंबर महिन्यात शहरामध्ये ९ ८ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. तर , गेल्या चार महिन्यांत १८८ जणांना डेंग्यूची बाधा झाली आहे . महापालिका व खासगी रुग्णालयांतील ही एकत्रित आकडेवारी आहे . खासगी रुग्णालयांमध्ये दाखल डेंग्यूच्या रुग्णांची नोंद करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने केल्या आहेत . त्यानुसार , खासगी रुग्णालयांकडूनदेखील डेंग्यूच्या रुग्णांची माहिती कळविण्यात येत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे . रुग्णसंख्येत तिप्पट वाढ शहरामध्ये जानेवारी महिन्यात २ जणांना डेंग्यूची लागण झाली होती . त्यानंतर फेब्रुवारी ते मे अशा चार महिन्यांमध्ये डेंग्यूचे संशयितरुग्ण आढळले.

मात्र , डेंग्यूची लागण झालेल्या एकाही रुग्णांची नोंद झाली नाही . जून महिन्यापासून पुन्हा डेंग्यूचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली . जूनमध्ये केवळ १७ जणांना डेंग्यूची लागण झाली होती . जुलै महिन्यात हा आकडा दुपटीने वाढला . डेंग्यू रुग्णांची संख्या ३७ वर जाऊन पोहोचली . तर , ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ३६ बाधित रुग्ण आढळले . त्यामुळे ही संख्या नियंत्रणात होती . मात्र , सप्टेंबर महिन्यात हे रेकॉर्ड तोडत जवळपास तिपटीने रुग्णसंख्येत वाढ झाली आहे सप्टेंबरमध्ये तब्बल ९ ८ रुग्णांना डेंग्यूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे .

खासगी दवाखान्यांमध्ये आठवड्यातून दोन ते तीन रुग्ण खासगी दवाखान्यात डेंग्यूझालेल्या रुग्णांच्या प्रमाणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला याबाबत एका दवाखान्यात विचारणा केली असता आठवड्यातून किमान दोन ते तीन रुग्ण डेंग्यूचे आढळत असल्याची माहिती मिळाली . तर , एका खासगी लॅबमध्ये विचारणा केली असता , दोन ते तीन दिवसांतून एक डेंग्यूचा रुग्ण आढळत असल्याची माहिती देण्यात आली.

डेंग्यूची लक्षणे : तीव्र ताप , तीव्र डोकेदुखी , स्नायुदुखी व सांधेदुखी , उलट्या होणे , डोळ्यांच्या आतील दुखणे , अंगावर पुरळ , अशक्तपणा , भूक मंदावणे , तोंडाला कोरड पडणे आदी