राजुरीत बिबट्याच्या हल्ल्यात घोडी ठार

रामदास सांगळे
विभागीय संपादक
०६ ऑक्टोबर २०२२

राजुरी


राजुरी या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षीय घोडी ठार झाल्याची घटना गुरूवार दि.६ पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नुसार राजुरी (ता.जुन्नर) येथील संतोष सुरेश औटी यांचा घराजवळच गायांचा गोठा असुन त्यांणी या घोडीला गायांच्या बाजुला बांधले होते.आज पहाटेच्या सुमारास बिबट्याने गोठयाला असलेल्या जाळीच्या वरुन उडी मारुन आतमध्ये प्रवेश करुन घोंडीवर हल्ला करुन घोडी भक्ष केली.घोडी वर झालेल्या हल्ल्याने गायांचा ओरडण्याचा आवाज आला असता औटी हे गोठयाजवळ आले असता बिबट्या आत मध्ये होता.त्यांणी मोठ्याने ओरडल्या ने बिबट्याने या ठिकाणाहुन पळ काढला.परंतु या झालेल्या हल्ल्यात घोडी मुत्यूमुखी पडली आहे.

दरम्यान औटी यांणी पंधरा दिवसांपूर्वीच ७५ हजार रुपयांची हि घोडी खरेदी केली होती.बिबटयाने तिला मारुन टाकल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.तसेच या परीसरात बिबटयांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत च चालले असुन या परीसरात वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष मुक्ताजी औटी यांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *