पिंपरी चिंचवड शहराची Indian Cycles4change Challenge अंतर्गत सायक्लोथॉन स्पर्धेत देशभरातील ११ शहरांमध्ये निवड – महापौर उषा उर्फ माई ढोरे

शहराच्या नावलौकीकात भर, १ कोटीचे बक्षीस जाहीर

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी चिंचवड -दि २९ जुलै २०२१
भारत सरकारच्या Cycles4change Challenge च्या या उपक्रमात पिंपरी चिंचवड शहराची देशातील ११० शहरांमधून प्रथम पहिल्या २५ शहरांमध्ये निवड झाली होती. त्यानंतर त्याचे प्रात्यक्षिक सांगवी फाटा- साईचौक या मार्गावर केले होते. त्याचे पुन्हा Cycles4change Challenge आयोजकांकडे Webinar द्वारे सादरीकरण जुन २०२१ रोजी करण्यात आले होते. त्यावरील प्रश्नोत्तरे व सादरीकरणाच्या आधारे भारतातुन पहिल्या ११ शहरांमध्ये पिंपरी चिंचवडची निवड झाली असून याबाबत दि.२८/०७/२०२१ रोजी मा. सेक्रेटरी MoUHA, भारत सरकार यांनी जाहीर केले आहे. सदर स्पर्धेत महाराष्ट्रातून २ शहरांची निवड झाली आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहराचा समावेश आहे. भारत सरकारच्या Cycles4change Challenge या उपक्रमाअंतर्गत पहिल्या ११ शहरांमध्ये निवड झाल्याने पिंपरी चिंचवड शहरास र.रू.१ कोटीचे बक्षीस जाहीर झाल्याने शहराच्या नावलौकीकात भर पडली असून ही शहरवासीयांसाठी गौरवाची बाब असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली. महापौर कार्यालयात आज दि. २९ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी, उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती ऍड.‍ नितीन लांडगे, आयुक्त राजेश पाटील यांच्यासह नगरसदस्य व नगरसदस्या ‍उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने (MoHUA) सुरू केलेल्या Incia Cycles4change challenge या योजनेमध्ये सहभाग होता. त्याकरीता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार प्रथम प्रारूप (Pilot) सायकल मार्ग तयार करणे आवश्यक होते. सदर योजनेअंतर्गत Pilot Cycle Track करताना शहरातील नागरिकांचा सहभाग नोंदवून त्यांच्या सुचना व गरजा सायकल मार्ग तयार करताना विचारात घेणे आवश्यक असल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने वेबसाईट, फेसबुक व सारथी अँपद्वारे नागरिकांना / सायकल्स प्रेमींना आवाहन करून १४ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत त्यांचेकडून सर्व्हेक्षण फॉर्म भरून घेण्यात आले होते. सदर सर्व्हेक्षणाकरीता जे रस्ते शाळा/कॉलेज, कंपनी कमर्शियल शॉपिंग कॉम्पलेक्स व रहिवाशी भाग यांना जोडणारे आहेत. असे खालील सह मुख्य रस्ते सायकल मार्ग तयार करण्यात आले होते. तसेच नागरिकांना आवश्यक असलेला एखादा सोयीस्कर मार्ग सुचवावा, असे आवाहन करण्यात आले होते. यामध्ये,

मार्ग क्र.१ विशालनगर, पिंपळे निलख येथील २४ मी.डी.पी. रस्ता,

मार्ग क्र.२ काटे पाटील चौक, पिंपळे सौदागर ते कस्पटेवस्ती चौक

मार्ग क्र.३ सांगवी फाटा ते साई चौक, जगताप डेअरी

मार्ग क्र.४ काळेवाडी फाटा ते साई चौक, जगताप डेअरी

मार्ग क्र.५ बिर्ला हॉस्पिटल ते शिवाजी चौक, हिंजवडी (MDR-31)

मार्ग क्र.६ मोशी ते तळवडे आयटी पार्क (देहू आळंदी रस्ता) यांचा समावेश होता.

सदर सर्व्हेक्षणामध्ये एकूण १४५० नागरिकांना सहभाग घेतला होता, त्यांचे अँनालिसीस केले असून नागरिकांच्या सर्व सुचना व मतांचे सविस्तर विवरण तयार करून सांगवी फाटा ते साई चौक या सुमारे ४.० किमी लांबीचा प्रारूप लायकल मार्ग दोन्ही दिशेने करण्याचे निश्चित करण्यात आले होते. तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे प्रत्यक्ष मार्गावर सायकल स्वारांकडून हॅंडलबार सर्व्हे दि.२०/०९/२०२० व दि.१०/१०/२०२० अशा दोन वेळा तयार करून त्यांच्या सुचना व अडचणी जाणुन घेतल्या. त्यानुसार सायकल ट्रक वर पार्क केलेली वाहने, स्टॉर्म वॉटर लाईनचे चेंबर्स, रस्त्यावर खड्डे व वाहनांचा प्रचंड वेग या बाबीचा विचार करून सुरक्षित सायकल मार्ग करणे आवश्यक आहे. त्यांचे संपुर्ण अँनालिसिस श्री. आशिक जैन, डिझाईन कार्यशाळा, पुणे यांनी तयार केले आहे. त्यानुसार राजीव गांधी पुल औंध ते साई चौक (जगताप डेअरी) हा मुख्य प्रारूप सायकल मार्ग (Main Pilot Cycle Track) आणि सुदर्शन चौक ते कस्पटे चौक-५.०० किमी लांबी व विशालनगर पिंपळे निलख डि.पी. रस्ता-३.०० किमी दोन्ही दिशेने असे दोन प्रारूप पुरक सायकल मार्ग (Neighbourhood Cycle Track) करण्याचे निश्चित केलेले होते. त्यानुसार सायकल मार्ग सुमारे २.२० मीटर रूंदीचा रस्त्याच्या दोन्ही बाजुस पदपथास लागून पेंटींग करून व त्यासाठी फायबरचे स्टड्स, डिलिनेटर्स, ट्रॅफिक कोन, थर्मोप्लास्ट पेंट इ.साहित्य वापरून सायकल मार्ग तयार करणेत आले आहे.

त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्टसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त दि.१ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ७.०० वा. सायक्लोथॉन आणि वॉकेथॉन कार्यक्रमाचे आयोजन ऑटोक्लस्टर, चिंचवड येथून काळेवाडी फाटा व परत ऑटोक्लस्टर या मार्गावर करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास सुमारे ७०० सायकलस्वारांनी सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिका, इंडो अँथेलॅटिक सोसायटी, इन्स्टीट्युट (IAS) फॉर ट्रान्सपोर्टेशन अँण्ड डेव्हलपमेंट पॉलिसी (ITDP), द ग्रीन लिन फॉन्डेशन, स्मार्ट सिटी,Bicycle Mayor, पिंपरी चिंचवड, आदिंच्या सहकार्याने करण्यात आला आहे.

तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका व लायन्स कल्ब यांच्या संयुक्त विद्यामानाने दि.२०/१०/२०२० रोजी सकाळी ६.०० वाजता सायक्लोथॉन आणि वॉकेथॉन कार्यक्रमाचे आयोजन सांगवी फाटा येथील महात्मा फुले उड्डाण ते वाय जंक्शन ते कस्पटे चौक ते काळेवाडी फाटा व तेथुन परत सांगवी फाटा या मार्गावर करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास सुमारे १००० सायकलस्वारांनी सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिका, लायन्स क्लब, इंडो अँथेलॅटिक सोसायटी (IAS), इन्स्टीट्युट फॉर ट्रान्सपोर्टेशन अँण्ड डेव्हलपमेंट पॉलिसी (ITDP), द ग्रीन लिन फॉन्डेशन, स्मार्ट सिटी, बायसीकल मेयर, पिंपरी चिंचवड, आदिंच्या सहकार्याने करण्यात आला आहे.

दि.१७/०१/२०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सायकल मित्र, अविरत श्रमदान आणि महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन भोसरी यांच्या संयुक्त विद्यमानाने सकाळी ६.०० वाजता रिव्हर सायक्लोथॉन आणि वॉकेथॉन कार्यक्रमाचे आयोजन भोसरी, गावजत्रा मैदान पासून जयगणेश साम्राज्य चौक ते संतनगर ते इंद्रायणी स्वीट कॉर्नर ते भोसरी एम.आय.डी.सी. व तेथुन परत भोसरी गावजत्रा मैदान असे १० कि.मी.साठी व भोसरी भोसरी, गावजत्रा मैदान पासून जयगणेश साम्राज्य चौक ते साने चौक, संतनगर, ते इंद्रायणी स्वीट कॉर्नर ते भोसरी एम.आय.डी.सी. व तेथुन परत भोसरी गावजत्रा मैदान असे २५ कि.मी. साठी या मार्गावर करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास सुमारे ६००० सायकलस्वारांनी सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सायकल मित्र, अविरत श्रमदान आणि महेशदादा स्पोर्ट् स फाऊंडेशन भोसरी, इंडो अँथेलॅटिक सोसायटी, इन्स्टीट्युट (IAS) फॉर ट्रान्सपोर्टेशन अँण्ड डेव्हलपमेंट पॉलिसी (ITDP), द ग्रीन लिन फॉन्डेशन, स्मार्ट सिटी, बायसीकल मेयर, पिंपरी चिंचवड, आदिंच्या सहकार्याने करण्यात आला, असे महापौर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *