रांका ज्वेलर्स चिंचवड च्या वतीने सौंदर्यवतींचा सन्मान

पिंपरी चिंचवड
०४ ऑक्टोबर २०२२


दिनांक-२६ सप्टेंबर पासून सर्वत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून एक समाजिक बांधिलकी जपत रांका ज्वेलर्स चिंचवड यांच्या वतीने विविध कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिलांचा सन्मान केला जात आहे. सन्मान नवदुर्गेचा, जागर स्त्री शक्तीचा या उपक्रमांअर्तगत रांका ज्वेलर्स चिंचवड व आपला आवाज आपली सखी यांच्या वतीने दिनांक 03 आक्टोबर 2022 रोजी नवरात्रीची आठवी माळ, रंग मोरपंखी, देवीचे रूप महागौरी यांचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहरातील मेकअप आर्टिस्ट क्षेत्रात यशस्वीरीत्या कार्य करणा-या मेकअप आर्टिस्ट यांना सन्मान नवदुर्गेचा, जागर स्त्री शक्तीचा या सन्मानाने आशा रांका यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

आपले सण समारंभ म्हणजे स्त्री मनाचा जणू आरसाच असतो. स्त्री मुळेच एखाद्या सणाला नवचैत्यन्य लाभते. आजच्या काळात सौंदर्य व सौदर्यप्रसादने याला खुप महत्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक स्त्रीला नटणे सजणे, विविध सणांनुसार मेकअप करणे, व आपले सौदंर्य खुलवणे ही एक आवडच निर्माण झाली आहे.आणि याच आवडीतुन मेकअप आर्टिस्ट क्षेत्रात महिलांना व्यवसायासाठी अनेक नवीन संधी उपलब्ध झाल्या आहे. अनेक वर्षापासून मेकअप आर्टिस्ट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या विविध मेकअपच्या माध्यमातून महिला वर्गाच्या मनात आपले एक विशेष स्थान निर्माण करणा-या मेकअप आर्टिस्ट यांना सन्मान नवदुर्गेचा, जागर स्त्री शक्तीचा या सन्मानाने आशा रांका यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रत्येक मेकअप आर्टिस्ट यांनी आपल्या मॅडेलचे रांका ज्वेलर्सच्या वतीने त्यांचा दालनात असलेले नवनवीन डिजाईन चे ब्रायडल कलेक्शन चे दागिने घालुन त्यांच्या सौंदर्यत अधिक भर घालती व त्यांचे फोटोशुट केले. यावेळी अधिक चांगले मेकअप करणा-या मेकअप आर्टिस्ट विद्या खोत,वैशाली भागोडिया व स्वाती घोडके यांचे क्रमांक काढण्यात आले. अशी सुवर्ण संधी रांका ज्वेलर्स च्या आशा रांका व आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगिता तरडे यांनी दिली त्या बद्दल सर्व उपस्थित मेकअप आर्टिस्ट यांनी त्यांचे आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *