केंद्र आणि राज्य सरकारने कष्टकरी जनतेला सामाजिक सुरक्षा द्यावी : बाबा कांबळे

पिंपरी प्रतिनिधी
०७ ऑक्टोबर २०२२


देशातील 50 कोटी पेक्षा अधिक कष्टकरी जनतेला सामाजिक सुरक्षा नाही. समान काम समान वेतन मिळत नाही, महागाई मुळे जगण्याचे हाल आहेत. आदिवासी पाड्यांमध्ये उपाशीपोटी राहून हा घटक जीवन जगत आहे. त्यामुळे कष्टकऱ्यांच्या हिताची धोरणे केंद्र आणि राज्य सरकारने राबवावी, असे प्रतिपादन कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले. आळंदी देवाची येथे कष्टकरी जनतेच्या प्रश्नांचा दसरा मेळावा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते.

आळंदी देवाची येथे कष्टकरी जनतेच्या दसरा मेळावा उत्साहात

यानंतर आळंदी देवाची इंद्रायणी घाटावर प्रमुख कार्यकर्त्यांनी एकमेकाला सोने देण्याचा कार्यक्रम देखील पार पडला, या कार्यक्रमात नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर रायकर, एडवोकेट प्रियश सोनवणे, टपरी पथारी हातगाडी पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे, उपाध्यक्ष अनिल गाडे, सरचिटणीस प्रकाश यशवंत, उपस्थित होते.

राजकीय दसरा मेळाव्यातून कष्टकऱ्यांची उपेक्षा कष्टकरी जनतेच्या प्रश्नासाठी दसरा मेळाव्याची आवश्यकता

बाबा कांबळे म्हणाले की, देशातील 50 कोटी पेक्षा अधिक कष्टकरी जनता विविध प्रश्नांनी त्रस्त आहे. आर्थिक धोरणे ठरली नसल्याने अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दिवाळीमध्ये अनेकांच्या घरामध्ये गोड बनवून सण साजरा केला जातो. मात्र कष्टकऱ्यांची दिवाळी दुःखातच जात आहे. या कष्टकऱ्यांच्या प्रश्नांकडे सध्याचे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत. यांचे प्रश्न राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर असणे गरजेचे आहे. गरिबांना म्हातारपणी पेन्शन मिळाली पाहिजे, असे बाबा कांबळे म्हणाले.

या मेळाव्यात दिल्ली येथे राष्ट्रीय आटो रिक्षा टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आळंदी येथील गोरगरीब कष्टकरी जनतेच्या वतीने बाबा कांबळे यांचा सन्मान करण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराज, साईबाबांची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आळंदीचे नगरसेवक प्रकाश कुराडे ज्ञानेश्वर रायकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी, आळंदी शहराध्यक्ष सुलतान शेख, भाजी मंडई अध्यक्ष राहुल कुराडे, उपाध्यक्ष महेश जाधव, मंचक यादव, रामदास मेत्रे, विठ्ठल भारती, महादेव भालेराव, रमेश पोलादे, शहाबाद शेख, शंकर पवार, नंदकुमार साठे, सचिन आडवळे, ओंकार बल्लार, चंद्र विलास वाघमारे,यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *