जुन्नर तालुका कोरोनामुक्त

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
२६ मार्च २०२२

आळेफाटा


जुन्नर तालुका शनिवार (दि.२६) रोजी कोरोना मुक्त झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वर्षा गुंजाळ यांनी दिली. जुन्नर तालुक्यात एकूण २७ हजार १७ नागरिक कोरोना बाधित झाले होते. त्यापैकी २६ हजार ३१७ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले. तर दोन वर्षात तालुक्यातील ७०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

कोरोनाची लागण होऊन तालुक्यातील आतापर्यंत ७०० नागरिकांचा मृत्यू

तालुक्यात चांगल्या प्रमाणात लसीकरण झाल्यामुळे तिसरी लाट कमी प्रमाणात दिसून आली.सध्या इतर देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून चौथी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.त्यामुळे तालुका जरी कोरोना मुक्त झाला तरी काळजी ही घ्यावीच लागणार आहे.तालुक्यातील सध्या १२ ते १४ वयोगटातील शाळकरी विद्यार्थ्यांच मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू असल्याची माहिती डॉ.वर्षा गुंजाळ यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *