सर्पदंश जनजागृतीपर व्याख्यान संपन्न:सर्पदंश व विषबाधा तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
 ०७ सप्टेंबर २०२२

घोडेगाव


घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी. काळे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास मंडळ आणि विघ्नहर मेडिकल फाउंडेशन या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच सर्पदंश जनजागृती अभियानाचा प्रारंभ एका व्याख्यान कार्यक्रमाने महाविद्यालयात संपन्न झाला. नारायणगाव येथील सर्पदंश व विषबाधा तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांचे “सर्पदंश, काळजी, लक्षणे, व्यवस्थापन आणि प्रथमोपचार” या विषयावर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले.

अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अजित काळे हे होते. याप्रसंगी डॉ.राऊत आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, सर्पदंशाचे प्रमाण शून्यावर आणणे हे आमचे ध्येय आहे. यासाठी सर्पदंशाच्या संदर्भातील अंधश्रद्धा दूर करणे,जनजागृती करणे,विद्यार्थी व वैद्यकीय डॉक्टरांना,ग्रामस्थांना प्रशिक्षित करणे हा फाउंडेशनचा उद्देश आहे. सर्पदंशाच्या बाबत समाज मांत्रिकांचे उपचार करत असतो, त्याबद्दलही शाळा व महाविद्यालयातून जागृती करणे हे महत्त्वाचे आहे. अलिकडे मांत्रिकाकडे जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सर्पदंश झाल्यानंतर सर्पदंशाच्या संदर्भात डॉक्टरांना प्रशिक्षण देणे हे अत्यंत गरजेचे आहे. आजपर्यंत देशातील दहा लाख डॉक्टरांना प्रशिक्षित केलेले आहेत. त्यामुळे डॉक्टरांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. देशभर जनजागृती चळवळ निर्माण झाली पाहिजे. यासाठी गावागावात विद्यार्थ्यांच्या टीम तयार करणे,सुरक्षित प्राथमिक उपचार उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप ग्रुप तयार करणे, यासंदर्भात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरेल,असे प्रतिपादन त्यांनी केले.

याप्रसंगी डॉ.पल्लवी राऊत यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर, उपप्राचार्य प्रा.डॉ.बाळासाहेब गव्हाळे,भूगोल विभागप्रमुख प्रा.डॉ.गुलाबराव पारखे, प्रा.डॉ.वल्लभ करंदीकर, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.भाऊसाहेब थोरात,विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा.कैलास उंबरे, श्री.सोपान मंडलिक,श्री.विकास गाडे इ.मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्राणीशास्र विभागाचे प्रमुख प्रा.रविंद्र वाळे यांनी तर सुत्रसंचालन विज्ञान विभागाच्या समन्वयक प्रा.अर्चना औताडे यांनी केले.आभार प्रा.राजश्री फलके यांनी आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *