इंधन दरवाढ मागे घ्या…गिरीजा कुदळे- पिं चिं शहर काँग्रेस महिला शहराध्यक्षा

रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी- ९ जुलै २०२१
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर कमी झालेले असतानाही भाजपाप्रणित केंद्रातील मोदी सरकार पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसवर भरमसाठ कर लावून सामान्य जनतेला लुटत आहेत. त्यामुळे बेरोजगारी आणि महागाईचा आगडोंब उसळला आहे. केंद्र सरकारने केलेल्या कर वाढीतून सात वर्षात बावीस लाख कोटींहून जास्त कर सामान्य नागरिकांच्या खिशातून वसूल केला आहे. महागाई रोखण्यासाठी इंधन दरवाढ मागे घ्यावी अशी देशभरातून नागरिकांची मागणी आहे. याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगामी आठ दिवस राज्यातील महिला कॉंग्रेस ठिकठिकाणी आंदोलन करणार आहेत. असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी केले.


केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई आणि इंधन दरवाढ झाली आहे. याचा निषेध करण्यासाठी आकुर्डीतील तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (दि. 9 जुलै) पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांच्या नेतृत्वाखाली याच्या आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, शामला सोनवणे, माजी नगरसेविका विद्या नवले तसेच शोभा पगारे, कमला श्रोत्रीय, मीना गायकवाड, हुरबानो शेख, वैशाली कुदळे, अलका जठार, स्वाती धर्मशाळे, फिजा बारसकर आदी उपस्थित होते.

Advertise


मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे देशभरातील नागरीक महागाईच्या खाईत लोटले जात आहेत. पेट्रोल, डिझेल साठी लिटरला शंभर रुपयांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. दररोज घरगुती गॅसच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे सर्व महिलांना कुटूंबाचा महिन्याचा खर्च भागविणे मुश्किल झाले आहे. वाढत्या महागाईमुळे अनेक कुटूंब प्रमुखांचा रोजगार बंद झाला आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. मुलांची शालेय फि, इंटरनेट बिल, वीजबिल, प्रवास खर्च, दूध, किराणा, गॅस, भाजीपाला, औषध उपचार या सर्वांचाच खर्च मागील पाच वर्षांत चौपट झाला आहे. यामुळे सर्व सामान्यांचे जगणे हलाखीचे झाले आहे. नागरिकांमध्ये मोदी सरकारविषयी तीव्र असंतोष आहे. सरकारने महागाईवर ताबडतोब नियंत्रण आणावे अशीही मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *