केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पुढिल काळात सहकारावर मोठा परिणाम होणार आहे – मा.गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील
मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
०६ सप्टेंबर २०२२
घोडेगाव

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पुढिल काळात सहकारावर मोठा परिणाम होणार आहे. यात छोटया बॅंका, सहकारी संस्था टिकवणे हे मोठे अवाहन रहाणार आहे. त्यामुळे आपल्या वडिलधा-या जुन्या लोकांनी 100 वर्षांपासून जोपासलेल्या व शेतक-यांना अडीनडीला उपयोगात आलेल्या संस्था अडचणीत येणार आहेत असे मत राज्याचे माजी गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
घोडेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला 100 वर्ष पुर्ण झाल्या निमीत्त वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेच्या जेष्ठ सभासदांचा सत्कार वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन सुरेशशेठ काळे, शारदा प्रबोधिनीचे ह.भ.प.पांडुरंग महाराज येवले, माजी सभापती कैलासबुवा काळे, सखाराम घोडेकर, सखाराम पाटील काळे, वसंतभाउ काळे, किरण घोडेकर, एकनाथ घोडेकर, अक्षय काळे, क्रांती गाढवे, मंजुषा बो-हाडे, रूपाली झोडगे, सुदाम काळे, सोमनाथ काळे, तुकाराम काळे, विनोद कासार, दिनेश घुले, मार्तंड काळे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वळसे पाटील म्हणाले, स्वातंत्रयाच्या पुर्वी 2021 साला मध्ये हि सोसायटी स्थापन झाली आहे. ब्रिटीश राजवट असताना आपल्या जुन्या मंडळींनी विचार करून सोसायटया, ग्रामपंचायती स्थापन केल्या व शंभर वर्ष संभाळल्या. शेतक-यांचे भले करण्यासाठी समाजात एकोपा ठेवून या संस्था उभ्या केल्या. आजही वर्षा अखेरीस मिळणा-या लाभांशचा आनंद शेतक-यांना मोठा असतो. 1947 पुर्वीच्या जुन्या लोकांकडून या जडणघडणी समजून घेणे महत्वाचे आहे. मात्र केंद्र सरकारने सहकार क्षेत्रातील माॅडेल बाय लाॅज प्रसिध्द केले आहे. यावर मते मागवली आहेत. याचा परिणाम सहकार क्षेत्रावर मोठा होणार आहे असे त्यांनी संागितले.