देवस्थानच्या वतीने आजी – माजी शिक्षकांचा गौरव

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
५ सप्टेंबर २०२२

आणे 


शिक्षक दिनानिमित्त श्रीरंगदास स्वामी महाराज देवस्थान संस्था आणे (ता.जुन्नर) च्या वतीने आणे येथील स्वामींच्या मंदिरात आजी – माजी शिक्षकांना गौरविण्यात आले अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष विनायक आहेर यांनी दिली. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आणे पठारावरील सरदार पटेल हायस्कूल, प्राथ.व माध्य. आश्रमशाळा तसेच अंगणवाडी सेविका व जि.प.प्राथ.शाळांमधील कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षिका-शिक्षकेतर कर्मचारी यांचा श्रीफळ देवून देवस्थानचे विद्यमान अध्यक्ष व माजी अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


यावेळी पंचायत समितीचे आदर्श शिक्षक विलास पिंगट तसेच रयत शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक काळे यांना देखील गौरविण्यात आले. आणे गावातील निवृत्त शिक्षकवृंद सर्वश्री बन्सीलाल आहेर गुरुजी,माजी सरपंच गोविंद कांबळे, मुरलीधर दाते, अनंथा आहेर,हरि आहेर,अशोक विश्वासराव, उषा दाते मॅडम, चंद्रकला आहेर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *