शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

पिंपरी प्रतिनिधी
२९ ऑगस्ट २०२२


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विश्व हिंदू परिषदेचे नेते उद्धव कदम यांनी आज शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपवर टीका केली.

1. संघ परिवारातील लोक हिंदुत्वाच्या शिवसेनेच्या परिवारात आले आहेत.

2. मला एका गोष्टीचा आश्चर्य वाटते आणि अभिमानही वाटतो, साधारणतः सत्ताधारी पक्षामध्ये जाण्यासाठी रांग लागते. पण प्रथमच महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र दिसतंय. गद्दारीनंतर महाराष्ट्राची माती ही मर्दांना जन्म देते, गद्दारांना नाही याची प्रचिती दाखवणारी ही सगळी मंडळी शिवसेनेत येत आहेत.

विश्व हिंदू परिषदेचे नेते उद्धव कदम यांनी आज शिवसेनेत पक्षप्रवेश केला
विश्व हिंदू परिषदेचे नेते उद्धव कदम यांनी आज शिवसेनेत पक्षप्रवेश केला

3. भारतीय जनता पक्षाने आम्ही हिंदुत्व सोडले आहे, अशी आवई उठवली होती. त्याला छेद देणारी आजची घटना आहे.

4. बहुजन, वंचित, मुस्लिम समाज शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहेत. एक वेगळे वातावरण, चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. हे चित्र नक्कीच देशासाठी मार्गदर्शक ठरेल.

5. खरे हिंदुत्व शिवसेनेकडे आहे, असे ज्यांना वाटते. त्यांनी मातोश्रीकडे यावे. मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत.

6. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार!


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *