राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही – उद्धव ठाकरे

१७ नोव्हेंबर २०२२


काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. सावरकर यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली, असा आरोप त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या याच विधानामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. आमच्या मनात सावरकर यांच्याविषयी आदरच आहे, असं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले ,राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केले त्याच्याशी आम्ही सहमत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात अतिव प्रेम, निष्ठा, आदर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी त्याग केला. हालअपेष्टा सोसल्या. तेच स्वातंत्र्य अबाधित राखण्याची आता गरज आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसंच बुलढाण्यातील शेगाव इथे होणाऱ्या राहुल गांधी यांच्या सभेला उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नाहीत.

राहुल गांधी सावरकरांबद्दल काही बोलले की आम्हाला प्रश्न विचारले जातात. मग ते पीडीपीसोबत मांडीला मांडी लावून बसले होते. ते काय देशप्रेम होते का? मी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. मुफ्ती मोहम्मद सईद भारत माता की जय म्हणतात का? त्या वंदे मातरम् म्हणतात का? ते भाजपाला कसे चालते,” असा प्रश्नदेखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *