स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते…

पवन गाडेकर
निवासी संपादक
१५ ऑगस्ट २०२२

जुन्नर


सोमवार दि.15 ऑगस्ट रोजी रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने आयोजित करण्यात भव्य रक्तदान शिबिरास तहसीलदार रविंद्र सबनीस यांनी सदिच्छा भेट देत उपक्रमाचे कौतुक केले तर dysp मंदार जावळे यांनीही रक्तदान करत उपक्रमात सहभाग नोंदवला.

रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष अतुल परदेशी करणी सेना पुणे जिल्हा अध्यक्ष बाबा परदेशी रोटरीयन डाॅ.सागर शिंदे,मिलींद घोडेकर,सचिन ताथेड, धनंजय चव्हाण तसेच रोटरीयन विजय कोल्हे यांनी सपत्नीक रक्तदान केले तर डाॅ.निलिमा जुन्नरकर यांनी विक्रमी 72 व्या वेळी रक्तदान करत रोटरी क्लब च्या उपक्रमास शभेच्छा दिल्या.

रक्तदान शिबिरात महिला, मुली यांचाही सहभाग होता.यावेळी सेक्रेटरी चेतन शहा,रोटरीरन तुषार लाहोरकर विनायक कर्पे हितेंद्र गांधी,प्रदिप चौधरी,रूपेश शहा,पवन गाडेकर,सचिन मलठणकर,सुनिल जाधव धनंजय राजुरकर नितीन माळवदकर विक्की पंजवाणी व रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी चे सभासद उपस्थित होते…

सदर कार्यक्रमाचे आयोजन जुन्नर शहरातील परदेशपुरा येतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात करण्यात आले होते.रक्तदान करणा-या प्रत्येक रक्तदात्यास रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले.सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी परदेशपुरा मित्र मंडळाचे प्रजापिता ब्रम्हकुमारी इश्वरीय विश्वविद्यालय यांचे महत्त्वाचे योगदान लाभले…