निराश न होता आनंदाने संकटाना तोंड द्या : प्रार्थना बेहेरे

दि. २८/१२/२०२२
पिंपरी


पिंपरी : आयुष्यात हे खूपच कमी आहे. त्यात चढउतार तर कायमच येत रहातात.निराश न होता आनंदाने संकटाना तोंड द्या. असे उदगार प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी काढले. जे. एस. पी. एम. संचलित ब्लॉसम पब्लिक स्कूल, ताथवडे, येथील तीन दिवशीय वार्षिक स्नेहसंमेलन शाळेत अत्यंत उत्साहाने संपन्न झाले.या स्नेहसंमेलनाच्या सांगता प्रसंगी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाचे उदघाटन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. दुसऱ्या दिवशी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय पाटकर,जेएसपीएम ताथवडे संकुलाचे संचालक डॉ पी.पी विटकर, तर सांगता समारंभ प्रार्थना बेहेरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी कॅंपसचे सहसंचालक डॉ. सुधीर भिलारे,प्रशासन प्रमुख रवी सावंत,राजेश्वरी रविराज सावंत, जेएसपीएमचे कार्यक्रम संचालक ॲग्नेस मार्कस,मुख्याध्यापिका स्वाती आरू, उपमुख्याध्यापिका दीपा पवार यांच्यासह जियो सॉफ्टवेअर डेव्हलपर्स व माजी विद्यार्थी दिग्विजय निकम, रिचा नहार, श्रुतिका लोकापुरे आदी उपस्थित होते.
‘अतुल्य भारत’ हि संकल्पना घेऊन पहिल्या दिवशी पूर्वप्राथमिक विभागाने आपले चिमुकल्यांचे कलागुण अत्यंत देखण्या पद्धतीने सादर केले. प्राचार्य स्वाती आरु यांनी शाळेच्या कार्य अहवालाचे वाचन केले.
दुसऱ्या दिवशी अभिनेता विजय पाटकर यांनी विद्यार्थ्याना अभ्यासाबरोबर कला, क्रीडा उपक्रमात सहभागी व्हावे असा सल्ला दिला.
प्रत्येक कार्यक्रमातून एक महत्वपूर्ण संदेश हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्याचे प्रेक्षकांमधून घोड्यावरील आगमन हा सोहळा तर नेत्रदीपक ठरला.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव तथा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले . हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विभागाचे पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले. आभार उपप्राचार्या दीपा पवार यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *