अमृता फडणवीस यांच्या बद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला आळेफाटा पोलिसांकडून अटक

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१२ ऑगस्ट २०२२

आळेफाटा


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अश्लील कमेंट्स करणाऱ्या तरुणाला आळेफाटा (ता.जुन्नर) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमित वायकर (रा. कावळे मळा, चाळकवाडी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत भाजपच्या नेत्या आशाताई बुचके यांनी आळेफाटा पोलिसात तक्रार दाखल केली होती अशी माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिली.

या तक्रारीत आशाताई बुचके यांनी म्हटले आहे की, दिनांक ११ रोजी दुपारी २ वाजल्याचे सुमारास जुन्नर येथे असताना मोबाईल फोनवर फेसबुक हे ॲप पाहत असताना त्यावर मी एका न्युज पेपरने फेसबुक पेजवर देवेंद्र फडणवीस यांची ठाणे येथील सभेत खरी शिवसेना आमच्या सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला उद्धव ठाकरेंना चिमटा या आशयाची बातमी वाचत असताना त्यावर कमेंट सेक्शन मध्ये पाहिले असता तेथे अमित वायकर नावाचे इसमाने देवेंद्र फडणवीस यांच्या बायको बद्दल इंग्रजी शब्दांमध्ये अत्यंत अश्लील व खालच्या दर्जाची हिनभाषा एका महिलेविषयी वापरून विनयभंग करण्याचे उद्देशाने कृती करून कमेंट करून ती समाज माध्यमावर प्रसिद्ध केली तसेच आम्हा सामाजिक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या म्हणून माझी इसमनामे अमित सुदाम वायकर (रा.कावळे मळा, चाळकवाडी पिंपळवंडी ता. जुन्नर जि.पुणे) यांचे विरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर करत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *