स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रामपंचायत नारायणगावच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१२ ऑगस्ट २०२२

नारायणगाव


ग्रामपंचायत नारायणगाव (ता. जुन्नर) यांच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव २०२२ निमित्त जिल्हा परिषदेच्या एकुण ९ प्राथमिक शाळांनी सहभाग घेऊन विविध स्पर्धेत एकूण ३५० विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या निमित्ताने हस्ताक्षर, चित्रकला व मैदानी खेळांचे आयोजन आज दिनांक १२/०८/२०२२ रोजी मुक्ताई समाज मंदिर कार्यालय नारायणगाव येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास एकूण ९ शाळांमधील ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. चित्रकला स्पर्धेचे विषय “ध्वजाचे चित्र काढून रंगवणे” यात अस्मिता राजेंद्र कोल्हे, राशीद हदीस मन्सुरी, किरण ज्ञानेश्वर कोल्हे, तसेच मोठ्या गटात मुस्कान अब्दुल मतीन, मुस्कान कमल अन्सारी, शेहनाज अ.खालिद अन्सारी, यांचे क्रमांक आले.

हस्ताक्षर स्पर्धेत खुशी गजानन जाधव, यश दादासाहेब शिंदे, स्वरा राजेंद्र वाजगे, अर्पिता श्रीनिवास वाकोडे, देवयानी राजेंद्र शिंदे, सहजार मनोवर मन्सुरी, मुस्कान कमाल अन्सारी, मोहम्मद अली जुबेर अन्सारी तसेच मैदानी खेळ दोरी उडी यात नुपूर रविंद्र नघे यांनी प्राविण्य मिळविले. त्यांना प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी स्वरूपात बक्षीसे देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश बाबू पाटे, उपसरपंच आरिफ आतार, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे ,सदस्य संतोष दांगट, राजेश बाप्ते, संतोष पाटे, गणेश पाटे, अक्षय वाव्हळ. उपस्थित होते. तसेच शाळेचे शिक्षक महादेव खैरे, किरण गावडे, मो.आजम, अखिल नळगीकर, इरफान खान, भाग्यश्री बेलवटे, कीर्ती चव्हाण, शकीला पटेल, सय्यदाबानो अब्बासअली, किशोरी तोडकर, वर्षा हांडे, झोडगे मॅडम, पवार मॅडम, हाडवळे मॅडम, डुंबरे मॅडम, ढेरंगे मॅडम, यांनी नियोजन केले. कार्यक्रमाचे आभार गणेश पाटे यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *