हर घर तिरंगा आजादी का अमृत महोत्सव जागृती कार्यक्रम उत्साहात

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१२ ऑगस्ट २०२२

नारायणगाव


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारने आयोजित केलेल्या हर घर तिरंगा, घर घर तिरंगा अभियान कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत नारायणगाव,मुस्लिम जमात नारायणगाव आणि जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नागरिकांना तिरंगा ध्वजाचे वितरण आणि जागृती कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले होते.

ग्रामपंचायत व मुस्लिम जमात नारायणगाव तर्फे नागरिकांना तिरंगा ध्वजाचे वाटप

यावेळी लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, उपसरपंच आरिफ आतार, विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, संतोष पाटे, पोलीस उपनिरीक्षक विनोद दुर्वे, मौलाना अब्दुल बारी, हाफीज शेहबाज रजा, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष एजाज आतार, सचिव मेहबूब काझी, मुख्याध्यापिका सईदा बानो जुबेर आतार, जुबेर शेख, रज्जाक काझी, रेहान कुरेशी, शफीखान, मुस्तफा अन्सारी, दानिश इनामदार, एकलाख आतार, एजाज चौधरी, हमीद पिंजारी, अस्लम आतार, साद शेख इत्यादी मान्यवर, नागरीक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित हा राष्ट्रीय उपक्रमचा जागृती कार्यक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. नारायणगावमध्ये आपण सर्व नागरिक एकत्र प्रयत्न करून उत्तमरीत्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया, सर्व नागरिकांनी यासाठी उत्तम सहकार्य करावे असे आवाहन लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी केले.

तसेच हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी होताना सर्व नागरिकांनी ध्वज फडकवताना घालून दिलेल्या आचारसंहिते बद्दलची माहिती पोलीस उपनिरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. कार्यक्रमाअगोदर जिल्हा परिषद उर्दू शाळा नारायणगाव यांनी जागृती रॅलीचे आयोजन केले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी महापुरुषांची केलेली वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. विद्यार्थ्यांनी यावेळी देशभक्तीपर समूहगीत, भाषणे सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेहबूब काझी यांनी केले, सूत्रसंचालन अकील दुरुगकर आणि आझम शेख यांनी केले व आभार इरफान खान यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *