नारायण राणेंना हायकोर्टाचा दणका,अधीश बंगल्यातील बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२० सप्टेंबर २०२२


भाजप नेते तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील बांधकाम पुन्हा एकदा बेकायदा ठरवून उच्च न्यायालयाने ते दोन आठवड्यांत पाडून टाकण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. याव्यतिरिक्त कोर्टाने राणे यांना १० लाखांचा दंडही ठोठावला आहे.

नारायण राणे यांच्या बंगल्यात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त बेकायदा बांधकाम करण्यात आल्यानं महापालिकेने नोटीस बजावली होती. यानंतर बांधकाम नियमित व्हावं यासाठी रिअल इस्टेट कंपनीकडून महापालिकेकडे याआधीही अर्ज करण्यात आला होता. मात्र महापालिकेने तो अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पण न्यायालयाने याचिका फेटाळली होती.

नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. पुढील दोन आठवड्यांत अतिरिक्त बेकायदा बांधकाम तोडण्याची कारवाई करून नंतरच्या एक आठवड्यात कृती अहवाल सादर करा, असंही हायकोर्टाकडून पालिकेला सांगण्यात आलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *