श्री क्षेत्र भीमाशंकर येथील खोल दरीमध्ये, आडकलेल्या सहा युवकांना वाचवण्यात घोडेगाव पोलीसांना यश

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१२ जुलै २०२२

भिमाशंकर


सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व त्यांचे कर्मचारी तसेच काही स्थानिक युवकांची दमदार कामगिरी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर कडे बैलघाटाने येणारे उल्हासनगर येथील सहा युवक मुसळधार पडणारा पाऊस व दाट धुक्यामुळे खोल दरी मध्ये आडकले घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व त्यांचे कर्मचारी तसेच काही स्थानिक युवक यांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात यश आले.

मुंबई उल्हासनगर येथील सहा युवकां बाबत झाला आहे. पवन अरुण प्रताप सिंग (वय २६ वर्ष) (रा.उल्हासनगर) सर्वेश श्रीनिवास जाधव (वय वर्ष २६) निरज रामराज जाधव (वय २८वर्ष) दिनेश धर्मराज यादव (वय २३वर्ष) हितेश श्रीनिवासी यादव (वय २५ वर्ष) अंकुश सत्यप्रकाश तिवारी (वय २३ वर्ष) सर्व राहणार उल्हासनगर ह्या सहा युवकांनी कोकणा मधून दुपारी चढायला सुरुवात केली रस्त्याने मुसळधार पाऊस व दाट धूके होते या वातावरणात सायंकाळी पाच वाजता अंधार पडला यात त्यांना रस्ता दिसेनासा झाला हे सहा जण घाबरलेपोलीस व स्थानिक तरुणांनी अडकलेली दरीची जागा शोधून काढली व त्यांना दोरखंड व इतर साहित्यांच्या आधारे सुरक्षित बाहेर काढले.

मुसळधार पाऊस व दाट धुके असल्यामुळे मदत कार्य करण्यास खुप अडचणी येत होत्या या मोहिमेमध्ये घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण पोलीस नाईक तेजस इष्टे नामदेव ढेंगळे रोहिदास गवारी स्वप्नील कानडे माणिकराव मुळूक जीवन गवारी मनीषा तुरे वृषाली भोर तसेच स्थानिक युवक सागर मोरमारे व सुरज बुरुड यांनी अथक परिश्रम घेतले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *