जी २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुणे शहरात बाईक रॅलीचे आयोजन

दि. १०/०१/२०२३
पुणे


पुणे : जी २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर सज्ज होत असून पुणे महानगरपालिकेच्या वतीने जय्यत तयारी चालू आहे. शहरात जी-२० परिषदेच्या बैठकीच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रॅलीमध्ये महापालिका आयुक्त,अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल/ इस्टेट / विशेष), पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्ग, पदाधिकारी तसेच पुणे विद्यापीठाचे अंदाजे २ हजार विद्यार्थी, स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

पुणे महानगरपालिका व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने जी २० परिषदेच्या निमित्ताने जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेआलेली बाईक रॅली सकाळी ८ वाजता सुरुवात होणार असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे- शनिवारवाडा मागे, लाल महाल (थांबा) – एच. व्ही देसाई महाविद्यालय, लेले दवाखाना – शनिवारवाडा मुख्य प्रवेशद्वारा शेजारुन पुणे महानगरपालिका पुल (मंगला थिएटर समोरुन ) – सिमला ऑफिस- राहूल थिएटर समोरील पुलावरून गणेशखिंड मार्गे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वारातून वनस्पतीशास्त्र विभाग समोरुन मुख्य इमारतीमागे (रसायनशास्त्र विभागासमोरुन ) – स्वामी विवेकानंद पुतळा ( थांबा) – कुलगुरु निवासस्थानासमोरुन मुलींच्या वसतिगृहासमोरुन सेवकविहार येथे जाईल. तेथे सकाळी १० वाजता रॅलीचा समारोप होणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *