चाळकवाडी टोलनाक्याजवळ चोरट्यांनी केली दोन दुकानांची चोरी

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
१ जून २०२२

जुन्नर


चाळकवाडी(ता. जुन्नर ) टोलनाक्याजवळ असलेल्या दोन दुकानांचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी जवळपास अंदाजे एक लाख रुपये तीस हजार रुपये किंमतीचा माल चोरला असल्याची घटना बुधवारी ( दि १ जून)रोजी पहाटे तिन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की चाळकवाडी टोलनाक्याजवळ पुणे नाशिक महामार्गालगत पत्र्याचे गाळे आहेत. या गाळ्यांमध्ये शिवाजी काचळे यांचे शिव इलेक्ट्रॉनिक्स व शाम जयराम यादव यांचे विघ्नहर्ता कार डेकोरेटर अशी दुकाने आहेत.

दुकानांच्या पाठीमागील बाजूने पत्रा उचकटून आत प्रवेश… सी सी टीव्ही कॅमेऱ्यावर बॅटरीचा प्रकाश टाकून कॅमेऱा बंद केला.

बुधवारी पहाटे तिन ते चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन्हीही दुकानांच्या पाठीमागील बाजूने पत्रा उचकटून आत प्रवेश करत दोन्हीही दुकानातील सुमारे एक लाख तीस हजार रुपये किंमतीचे इलेक्ट्रॉनिक्स व कार डेकोरेटरचे साहित्य चोरून नेले या अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी दुकानात असलेल्या सी सी टीव्ही कॅमेऱ्यावर बॅटरीचा प्रकाश टाकून कॅमेऱा बंद केला असल्यामुळे या घटनेचे सी सी टीव्ही फुटेज मिळू शकले नाही ही घटना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली दुकानदार शिवाजी काचळे व शाम यादव यांनी याबाबतची माहिती आळेफाटा पोलिसांना दिल्यानंतर आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी रफीक तडवी गोविंद केंद्रे,केशव कोरडे पोलिस मित्र विनायक भागवत यांनी घटनास्थळी भेट देऊन पहानी केली याघटनेची फिर्याद शाम जयराम यादव यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात दिली असून पुढील तपास आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर करत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *