भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आयोजकांना नवी ऊर्जा आणि हातावर पोट असणाऱ्यांना कोटींचा रोजगार देऊन गेली

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०२ जून २०२२

टाळगाव चिखली


बैलगाडा शर्यत म्हटले की एक घाट आणि घाटाच्या बाजूला बसण्याचा कठडा. घाटात तळापासून ते वरच्या निशाणा पर्यंत स्पीकरचे कर्ण, एक मुख्य व्यासपीठ त्याची भव्यता त्या त्या जत्रेवर अवलंबून असते. बैलगाडा घाटात त्याच व्यासपीठासमोर अनाऊन्सर मंडळींसाठी एक छोटे व्यासपीठ आणि तीन माईक आणि चार अनाऊन्सर. शेजारी टाइम मास्टर साठी जागा. खाली लिखाण, हिशेब , टोकन घेणारे व नोंद करणारांसाठी जागा. मुख्य व्यासपीठावर पाहुण्यांची गर्दी . हार तुरे सत्कार.. तिकडे एक वेगळा माईक आणि बक्षिसे ठेवणीची जागा अशी असते सर्वसामान्य बैलगाडा यात्रेतील एकंदरीत ठेवण.

पण भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत टाळगाव चिखली येथे होणार त्याचे टीजर, एक महिना अगोदरच एक एक बैलांचा फोटो आणि भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत लवकरच होणार असे सोशल मीडियावर टीजर फिरू लागले. जसजशी तारीख जवळ येऊ लागली तसतसे टीजर आणि फोटोंची संख्या वाढत गेली. आणि हळूहळू गावोगावी या स्पर्धेची चर्चा रंगू लागली.

खरे तर कोणताही इव्हेंट म्हटले तर पूर्वी हमखास नाव यायचे पुण्यातील सुरेश कलमाडी मगसातासमुद्रापार पार गेलेला गणेश फेस्टिव्हल असो की जगात चर्चा होणाऱ्या पुणे फिल्म फेस्टिवल असो. आता कोणताही मोठा इव्हेंट म्हटले की नाव समोर येते ते भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे. कारणही तसेच आहे कोणताही कार्यक्रम असो मग करायचा तर तो मनापासून आणि भव्यदिव्य असे या माणसाचे गणितच ठरलेले. मग भोसरीतील इंद्रायणी थडी असो की महाराष्ट्र केसरी कुस्तीचा मर्दानी फड, की साक्लोथॉन स्पर्धा असो त्याची भव्यताच एव्हडी असते की जणू हे इव्हेंट घ्यावे तर ते महेश लांडगे यांनीच अशी धारणाच हा माणूस जनमनावर करून टाकतो. याचे मुख्य कारण म्हणजे यातील कोणताही इव्हेंट असो त्याचे अगोदर पूर्ण प्लॅनिंग केले जाते. आणि नंतरच ते लोकांसमोर येते. जेव्हा लोकांसमोर टीजर येतो तेव्हा त्याची रूपरेषा ठरलेली असते. मग तो इव्हेंट चालतो पूर्ण एक महिना तयारीसह.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठली तेंव्हापासूनच अशी काही बैलगाडा शर्यत घ्यायची की त्याची चर्चा राज्यभर एक महिना व्हायला हवी असे मनोमन आमदार महेश लांडगे यांनी ठरवलेले होते.बैलगाडा शर्यत घ्यायची हे ठरले त्या अगोदर जागेची पाहणी सुरू झाली. तीन चार ठिकाणे पाहिल्यावर टाळगाव चिखली येथील रामायण मैदानावर घेण्याचे ठरले ते फायनल सम्राट गाडा मालक माजी महापौर राहुल जाधव यांच्यामुळेच राहुल जाधव हे बैलगाडा मालक असल्याने निम्मे काम येथेच पूर्ण झाले..कारण त्यातील प्रत्येक बाबतीतच्या खाचाखोचा आणि पूर्ण माहिती असल्याने आयोजक आमदार महेश लांडगे यांना यावेळी जास्त तांत्रिक गोष्टींच्या जबाबदारीतून उसासा मिळाला. अगोदर जत्रेचे मैदान ठरले आणि मग सुरू झाला या मर्दानी खेळाच्या नियोजनाचा खेळ.

असा इव्हेंट घ्यायचा तर त्यातील तज्ञ मंडळी असायला हवी मग जय हनुमान मित्र मंडळ संयोजनासाठी घेण्याचे ठरले. कोणताही इव्हेंट असला की पै.महेश लांडगे यांचे दोन खंदे समर्थक माजी महापौर राम लक्ष्मणासारखे जोडीला असतातच. त्यात एक बैलगाडा मालक म्हटल्यावर त्यातील खोचा माहीत असल्याने अगदी बारीकसारीक गोष्टीत कोणतीही कसूर ठेवायची नाही हे राहुल जाधव यांनी अगोदरच ठरवले असणार.आणि त्याप्रमाणे सगळे घाटात घडत होते.

कोणताही इव्हेंट म्हटले की पैसा आणि नियोजन आलेच. येथे तर घाट बांधण्यापासूनची तयारी करायची होती. जसे बैलगाडा शर्यत घ्यायचे ठरले तशी मोजक्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली असणार. बैठकीत दोन खंदे समर्थकांसह आमदारांचे दोन्ही बंधू मोजके मित्र बैलगाडा शर्यतीत अनेक वर्षे हयात घालवलेले मोजके बुजुर्ग यांची बैठक पार पडली असणार. त्यात आमदार महेश लांडगे यांच्या नावाला शोभणारी बैलगाडा शर्यत यावर चर्चा झाली असणार मग शर्यतीसाठी असणारे बक्षीस, घाटाचे दिव्य काम, स्टेज, स्पीकर व्यवस्था , जेवण , स्पर्धा भल्या सकाळी सुरू होणार म्हटल्यावर मुक्कामी आलेल्या बैलगाडा मालकांची राहण्याची सोय, भव्य व्यासपीठ या विषयावर अगोदर प्राथमिक चर्चा झाली असणार. त्यानंतर मग आमदार महेश लांडगे यांच्याकडे असणारी कार्यकर्त्याची फौज बोलावली असणार त्या बैठकीला छोट्या कार्यकर्त्यापासून तर मोठ्या धनिक नगरसेवक आणि सगळेच कार्यकर्ते यांच्यासोबत आमदारांच्या बैठकीत आमदारांच्या मनातील बैलगाडा शर्यतीची संकल्पना दोन माजी महापौरांनी मांडली असणार. मग पाहिले आले ते बक्षीस काय काय असावे यावर चर्चा. त्यावर खूप वेळ चर्चा झाली असणार आणि मग एक एक कार्यकर्त्यांकडूनच बक्षिसांची जबाबदारी उचलली असणार आणि ते नेहमी पडद्यामागे असणारे मास्तर माईंड कार्तिक लांडगे यांनी चोख बजावले असणार. अगोदर बोलेरो आणि ट्रॅक्टर बक्षीस असावे असे ठरले असेल पण त्याहीपेक्षा काही मोठे देता येईल ? याची चर्चा झालीच असणार मग एक तरुण उद्योजक निलेश बोराटे पुढे आले आणि JCB ची घोषणा केली. त्यानंतर एक एक बक्षीस महेश लांडगे यांचे समर्थक पुढे येऊन घोषणा करू लागले आणि हा हा म्हणता सगळी बक्षिसे जमा झाली. त्याची रक्कम कोटींच्या घरात गेली आणि मग खऱ्या अर्थाने भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत अशी उपाधी जोडली गेली ती या कोटींच्या बक्षिसांमुळेच.

भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत साजेसे असे नियोजन बाकी होते पण टीजर साठी आणि सोशल मीडियावरील जाहिरातीसाठी या अशा भव्य बक्षिसांची गरज होती ते काम सुरवातीच्या टप्प्यात पूर्ण झाले होते. अगोदर JCB, बोलेरो, ट्रॅक्टर आणि चांदीचा रथ एव्हडे झालेवर मग एक एक कार्यकर्ता पुढे आले आणि बक्षीस देण्यासाठीची चढाओढ शेवंतपर्यंत सुरू होती ती अगदी घाटात पुढील वेळी जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर याच घाटात पहिल्या नंबर ला आलिशान मर्सिडीज बक्षीस असणार असे निलेश राणेंनी घोषित करून टाकले. हे कशामुळे तर त्यांनीही अशी ना भूतो ना भविष्ययती बैलगाडा शर्यत पहिली नव्हती. जाहिरातीचा इम्पॅक्ट इतका झाला की नुसत्या सोशल मीडियाच्या जाहिरातीमुळे थेट मध्य प्रदेश वरून एक गाडामालक कोणलाही संपर्क न करता डायरेक्ट यात्रेत स्पर्धेत हजर झाला ही खरे तर अभिमानाची गोष्ट होती आणि येथेच ही स्पर्धा खरेच भारतातील नव्हे तर आशियातील सर्वात मोठी स्पर्धा असल्याचे जेष्ठ समोलचक माऊली पिंगळे, साहेबराव आढळराव, आणि अण्णा जाधव, यांनी आपला आवाजकडे बोलताना सांगितले. या स्पर्धेचे धावते समालोचन करण्यासाठी १८ निवेदकांची फौज होती त्याचे नेटके नेतृत्व माऊली पिंगळे आणि साहेबराव आढळराव करत होते.

स्पर्धा सुरू होण्याअगोदर एक महिना या घाटाचे काम दिवसरात्र सुरू होते आणि त्याच्या शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले ते संयोजक माजी महापौर राहुल जाधव आणि नितीन अप्पा काळजे यांनी. त्यांना कुशल संघटक कार्तिक लांडगे आणि पडेल ते काम करणारे आणि जेथे कमी तेथे आम्ही अशी धारणाच जपणारे कामगार नेते सचिन भैया लांडगे कारणही तसेच आहे हा माणूस केव्हाच व्यासपीठावर दिसला नाही. दिसला तो फक्त काम करताना मग तळाला असणारी गर्दी विनंती करून कमी करणे असो की देशी गाईचे प्रदर्शन स्पर्धा असो तेथे काम करतानाच कोणताही बडेजाव न करता काम करणारे सचिन लांडगे दिसले. स्पर्शा सुरू होण्यागोदर राहुल जाधव यांची घाटात येऊन जेव्हा मी मुलाखत खेतली तेव्हाच सांगितले होते की या स्पर्धेसाठी हे मैदान आणि घाटाच्या आजूबाजूची जागा कमी पडणार आणि कितीही स्क्रीन लावा हा मैदानी खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक मैदानाभोवतीच याच डोळी याच देही पाहण्यासाठी गर्दी करणार आणि माझाच अंदाज खरा ठरला बैलगाडा शौकिनांचा महापूर असा लोटला की माजी महापौरांना कित्येकदा घाट बंद करावा लागला. आणि अनाऊन्सर वारंवार सांगत होते की घाटाच्या तळाशी मी जे जे लोक पाहतोय जिकडे पाहावे तिकडे बैलगाडा मालक दिसतात म्हणजेच आयोजकांचा गर्दीचा अंदाज चुकला होता. बसण्यास कोणलाही जागा नव्हती त्यामुळे माजी महापौर राहुल जाधव वारंवार विनंती करत होते की बाबांनो बैलगाडा मालकांना बैल जुंपण्यास जागा करून द्या हवे तर मुख्य व्यासपिठावर या माझ्या शेजारी येऊन बसा असे ओरडून ओरडून सांगत होते अखेर त्यांचा घसा कोरडा होऊन बसला पण घाटाच्या तळाशी असलेली गर्दी काही कमी होईना.पोलिसांनी कित्येकदा येऊन लाठी उगारली पण दाद मिळेना शेवटी तेही हतबल झाले. त्याच गर्दीतून वाट काढत बैलगाडा मालकांनी बाऱ्या जुंपल्या आणि सुसाट पळवल्याही.

घाटाच्या दोन्ही बाजूला असणारी बैठक व्यवस्था सिमेंट काँक्रेट मध्ये बांधली असल्याने निर्धास्त होते जर ती लाकडाची ग्यालरी असती तर नक्कीच काहीतरी अनर्थ घडला असता. गर्दीचे सगळे उच्चांक मोडीत निघाले. कारण सगळी जागा संपली होती आणि घाटातून हुसकावलेल्या गर्दीने स्क्रीनचा सहारा घेत हॉल मध्ये गर्दी केली पण ज्यांना प्रत्येक्षात हा थरार पाहायचा होता त्यांनी मग अगोदर गाडीच्या टपाचा आणि नंतर थेट बैठक व्यवस्था असणाऱ्या पत्र्याच्या शेवडचा आधार घेतला. धावते समालोचन करणारांनी माकडाची उपमा दिली आणि विनंती केली तरीही कोणी खाली उतरेना. तर कित्येक गाडा शौकिनांनी शेजारी असलेल्या उंच पाण्याच्या टाकीचा आधार घेत उंचावरून ड्रोनसारखा या स्पर्धेचा आनंद घेतला. आणि तशीच अवस्था मुख्य व्यासपीठाची झाली होती. जेष्ठ मान्यवरांसह कार्यकर्ते माजी नगरसेवकांनी उद्योजकांनी स्पर्धेस मदत करणारांनी व्यासपीठावर गर्दी केली होती स्टेजच्या क्षमतेपेक्षा कितीतरी वजन जास्त झाले होते आणि एक दोनदा असा आवाजही झाला होता तेव्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्पर्धा बंद करून राहुल जाधव यांनी भावनिक आवाहन केले की तुम्ही सगळे माझ्या घरातील अहात मी हात जोडून विनंती करतो मला नाव घ्यायला सांगू नका आपल्या मनानेच खाली उतरून जा. त्यांच्या भावनिक आवाहनाला साद देत व्यासपीठ जरासे मोकळे झाल्याने राहुल जाधवांनी उसासा सोडला.

मुख्य अतिथी आलेवर परत गर्दी झाली पण ती थोडा वेळापूर्तीच होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाहुण्यांना घाटातून वाजतगाजत व्यासपीठावर आणले तेव्हा तेही भारावून गेले. जिकडे पाहावे तिकडे गर्दीचा महापूर आणि वर पाहिले तर पाण्याच्या टाकीवरही आणि समोर ग्यालारीचे शेडवरही गर्दीच गर्दी दिसत होती आणि हेच दृश्य म्हणजे खरोखरच ही भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत असल्याचे त्यांनीही घोषित केले. या भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत यशस्वी झाली याचे श्रेय जाते ते आमदार महेश लांडगे यांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला कोण्हीही केव्हाही कोणताच मानापमान न पाहता आपापले काम चोख पार पाडत होता. मग अगदी निशाण वाला महेंद्र असो की तळाशी गाडा जुंपणारी चेतन गोट्या जाधव, बाळू ताम्हणे, सचिन सोनवणे, बबन तापकीर, पप्पू ठाकूर, केतन जरे, भाऊसाहेब कोळेकर, तुषार भालेकर तर गाडा ओढणारी राजू जाधव, रवींद्र जाधव, प्रणव जाधव आणि मित्र मंडळी तर लेखनिक विनायक साळुंके, निलेश आहेर, बाबू वाळुंजकर, अंकुश जाधव, राकेश जाधव असोत. हिशेब आणि टोकन चे काम चोख ठेवणारे दत्तू मामा बुर्डे, अभिजित गाडे, संदीप आहेर असोत यांनी सर्वांनी अगदी वडापाव खाऊन पाच दिवस काम चोख पडल्याने यांच्या एकीमुळेच ही स्पर्धा पार पडू शकली आणि हे आमदार महेश लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, नितीन अप्पा काळजे यांना मान्यच करावे लागेल

ही स्पर्धा काय देऊन गेली तर ही स्पर्धा हातावरचे पोट असणारांना कोटींचा रोजगार देऊन गेली. माझ्या प्रश्नाला उत्तर देत लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांनी बैलगाडा शर्यतीवर सिनेमा बनवला जाणार असल्याची घोषणा करून गेले. महेश लांडगे आणि मित्र परिवाराला भविष्यात याहीपेक्षा मोठा इव्हेंट करण्याची ऊर्जा आणि नव्या जोमाचा आत्मविश्वास देऊन गेली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *