नारायणगावातील पत्रकारांच्या हस्ते साई मंदिराच्या महाद्वाराचे पूजन व महाआरती

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२६ मे २०२२

नारायणगाव


वारुळवाडी तथा नारायणगाव या गावात प्रती शिर्डी व्हावी यासाठी नेहमी उराशी स्वप्न बाळगणारे थोर साईभक्त व ओम साई सेवा मंडळाचे अध्यक्ष विनायकनाना बाबुराव रसाळ यांनी आपले वडील स्व. बाबुराव महादेव रसाळ यांच्या स्मरणार्थ अकरा गुंठे जागा साई मंदिरासाठी विनामोबदला दान दिली आहे. या साई मंदिराचे काम प्रगतिपथावर असून मंदिराच्या काही भागाचे बांधकाम चालू असताना मंदिरातील महाद्वाराच्या चौकटीचे पूजन नारायणगाव येथील इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या पत्रकारांच्या हस्ते आज मंत्रोच्चारात व मोठ्या भक्ती भावात पार पडले.

११ गुंठे जागा दान देणाऱ्या दानशूर व्यक्तिमत्व विनायक रसाळ यांचा सन्मान

याप्रसंगी ओम साई सेवा मंडळाचे अध्यक्ष विनायक रसाळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्योजक संजय वारुळे, सुजित खैरे, सदानंद खैरे, बाळासाहेब मुंडे, सचिन दरेकर, वैभव मुथ्था, शिवाजी बोराडे, अनिकेत गाढवे, विकास सोसायटीचे संचालक बाळासाहेब भुजबळ, सुनील गोंधळी, हरीओम ब्रम्हे, अनिल दिवटे, सुदीप कसाबे, कुमार गायकवाड, राहुल खेबडे, श्रीकांत वायाळ, शेखरमामा वारुळे, धनंजय माताडे, सुनील इचके, कुमार खंडाळकर, रूपेश वाजगे, सचिन संते, संदीप शिंदे, संजय फुलसुंदर, किशोर खैरे, राजेंद्र संते, संदीप गांधी, शरद कदम, भाऊ श्रीवत, श्री सोनवणे, जाधेकर बाबा आदी मान्यवर उपस्थित होते.

नारायणगाव येथील श्री साईबाबा मंदिराच्या बांधकामाचे काम प्रगतीपथावर

श्री साईबाबा मंदिरासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च येणार असून यावेळी पत्रकार बांधवांच्या वतीने मंदिरासाठी देणगी देण्यात आली तसेच ज्या दानशूर व्यक्तींनी देणग्या दिल्या त्यांचीही नावे जाहीर करण्यात आली. याप्रसंगी आपला आवाज न्यूज नेटवर्क चे कार्यकारी संपादक किरण वाजगे व त्यांच्या पत्नी समृद्धी वाजगे तसेच पत्रकार रवींद्र कोल्हे, सचिन कांकरीया, रायचंद शिंदे, अतुल कांकरिया, संजय थोरवे, अमर भागवत, सचिन डेरे, अश्पाक पटेल, मंगेश रत्नाकर, तिर्थराज जोशी या पत्रकारांच्या हस्ते मंदिराच्या महाद्वाराचे पूजन व माध्यान्ह आरती करण्यात आली. यावेळी किरण वाजगे, रायचंद शिंदे, हरिओम ब्रह्मे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल दिवटे यांनी केले तर आभार भाऊ श्रीवत यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *