मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर गॅस टँकर उलटल्याने अपघातात तिघांचा मृत्यू

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०९ मे २०२२

पुणे


मुंबई पुणे द्रुतमार्गावर प्रोपोलिन गॅस टॅंकर उलटल्याची घटना घडली आहे . त्यामुळे घडलेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे हा टँकर जात होता होता. दरम्यान महामार्गावरच टँकर उलटल्याने दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे.

खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला असून, यामुळे मुंबई आणि पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. पुण्याहून मुंबईकडे हा टँकर जात होता. त्यावेळी खोपोली एक्झिटजवळ हा टँकर उलटला. दरम्यान, घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर बोरघाट पोलीस यंत्रणा, IRB पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल आदींनी घटनास्थळी धावा घेत मदतकार्य युद्धपातळीवर सुरु केले आहे.

अपघातग्रस्त टँकर पुण्याहून मुंबईकडे निघाला होता. टँकर खोपोली एक्झिटजवळ असताना टँकर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला आणि पुणे लेनवर आला. दरम्यान, अपघातानंतर टँकरला तीन गाड्या पाठोपाठ धडकल्या यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर दोन्ही मार्गांवरील वाहतूक मंदावली आहे. घटनेनंतर खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. सुदैवाने अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती झालेली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *