१४ नोव्हेंबर २०२२
पिंपरी
बेकायदारित्या कोयता बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने एकाला अटक केली. ही कारवाई ताथवडे येथे करण्यात आली. अभिषेक अमीरदास यादव (वय २३, रा. कृष्णा कॉलनी, रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे कोयता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार ताथवडे येथील डांगे चौक ते ताथवडेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत त्याला ताब्यात घेऊन एक कोयता जप्त केला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.