पुन्हा एकदा आढळराव पाटील दिसणार संसदेत – खासदार संजय राऊत

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०७ मे २०२२


शिवसेनेचे माजी खासदार शिवजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी येथे ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या उद्धाटनासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर आले होते. उद्धाटन प्रसंगी राऊत यानु मैदानात उतरत फटकेबाजीही केली..

मैदानावर फटकेबाजी केल्यानंतर पत्रकारांशी बोलतानाही अनेक विषयांवर फटकेबाजी केली. हे सरकार फार दिवस टिकनार नाही अशी सतत टीका करणाऱ्यांही सडेतोड उत्तर देत विरोधक नेहमीच आता महाविकास आघाडी सरकार पडेल मग पडेल असे वारंवार उलग्ना करण्यात येतात पण हे सरकार शाबूत असून पडू शकत नाही असेही सांगितले.

शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी चे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी सलग १५ वर्ष खासदार असणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला आहे. सेनेचा मुख्य आघाडीचा फलंदाजच बाद झाल्याने शिवसेनेत आणि त्यात पुणे जिल्ह्यात सेनेचा एकही आमदार नसल्याने सध्या सेनेत मरगळ असल्याचे जाणवते. त्याचाच धागा पकडून ही मरगळ झटकण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील पुन्हा संसदेत असतील अशी घोषणा केली त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरल्याचे दिसले.

खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे. पण त्यांनी लोकसभा आणि विधानसभेत राज्यात महाविकास आघाडीच राहणार असल्याचे सांगितले. म्हणजेच आढळराव पाटील यांची शिवसेनेकडून राज्य सभेवर वर्णी लागणार असल्याचे संकेतच दिले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ज्या दिवशी आढळराव पाटील यांचा पराभव झाला त्या दिवसापासून त्यांचा जनसंपर्क खूपच वाढला . शिरूर मतदार संघात सतत प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी आणि बैलगाडा बंदी उठल्यावर लांडेवाडी ला घेतलेली भव्य बैलगाडा शर्यत हीच त्यांची जमेची बाजू ठरलीय. त्यात सध्या सेनेकडे जिल्ह्यात ग्रामीण भागात आमदार आणि तुल्यबळ नेता नसल्याने पुणे जिल्ह्यात सेनेचे प्राबल्य वाढवण्यासाठीच सेनेकडून हा निर्णय घेतला असल्याचे जाणकार सांगतात.

मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका स्वबळावर लढाव्या लागतील असेच वाटते. त्यामुळे वर लोकसभा, विधानसभेमध्ये आघाडी असली तरी खाली कार्यकर्त्यांमध्ये भविष्यात मोठा संघर्ष पाहायला मिळेल असेच आताचे चित्र पाहायला मिळते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *